टीम इंडिया (Photo Credit: IANS)

ICC World Test Championship: चेन्नईच्या (Chennai) चेपॉक स्टेडियमवर नुकत्याच संपुष्टात आलेल्या पहिल्या टेस्टमध्ये टीम इंडियाने (Team India) शरणागती पत्करली आहे. भारताला (India) विजयासाठी 420 धावांचं मोठं टार्गेट मिळालं होतं पण, पाचव्या दिवसाच्या सुरूवाती पासूनच इंग्लंड (England) गोलंदाज नियमित अंतराने विकेट घेत राहिल्याने भारताला पराभव पत्करावा लागला. भारत आणि इंग्लंड इंग्लंड संघातील पहिल्या टेस्ट सामन्यानंतर आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (ICC World Test Championship) पॉईंट्स टेबलमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे. इंग्लंडने विजायासह पहिल्या स्थानावर झेप घेतली तर भारतीय संघाची चौथ्या स्थानी घसरण झाली आहे. इंग्लंडने चॅम्पियनशिपमध्ये आजवर 6 सामने खेळे असून 11 सामन्यात विजय मिळवला आहे आणि 70.2 विजयी टक्केवारीने मानाचे स्थान पटकावले. दुसरीकडे, भारताची 6 सामन्यातील हा चौथा पराभव ठरला. इंग्लंडविरुद्ध मालिका सुरु होण्यापूर्वी भारतीय संघ पहिल्या तर इंग्लंडचा संघ चौथ्या स्थानावर होता. (IND vs ENG 1st Test 2021: चेन्नई टेस्ट सामन्यात इंग्लंडची टीम इंडियावर 227 धावांनी मात, घरच्या मैदानावर भारताची विजयी मालिका खंडित)

दुसरीकडे, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपबद्दल बोलायचे तर न्यूझीलंडने यापूर्वीच फायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. ऑस्ट्रेलिया गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. इंग्लंडच्या प्रसिद्ध लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामन्यासाठी दुसऱ्या स्थानासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात दुसर्‍या क्रमांकाच्या लढत कायम आहेत. अंतिम सामन्याचे तिकीट मिळवण्यासाठी विराटसेनेला इंग्लंडविरुद्ध 2-1 किंवा 3-1 असा विजय मिळवणे गरजेचे आहे. ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा पुढे ढकलल्यानंतर न्यूझीलंडला फायदा झाला आणि किवी संघ कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. 18 जून ते 22 जून दरम्यान इंग्लंडच्या लॉर्ड्स मैदानावर टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाणार आहे.

इंग्लंडच्या संघाने शानदार कामगिरी करत यजमान भारतावर 227 धावांनी मात केली. इंग्लंडने विजयासाठी 420 धावांचे लक्ष्य ठेवले होते. मात्र, चेन्नई कसोटीच्या शेवटच्या दिवशी भारतीय संघ दुसर्‍या डावात फक्त 192 धावाच करू शकला आणि पाहुण्या संघाने 227 धावांनी मालिकेत विजयी सलामी दिली.