
आयसीसी (ICC) विश्वकपमध्ये आज भारत (India)-इंग्लंड (England) यांच्यात हायवोल्टेज सामना होत आहे. सेमीफायनलमध्ये आपली जागा निश्चित करण्यासाठी या मॅचमध्ये यजमान इंग्लंडला विजय मिळवणे गरजेचे आहे. दुरीकडे, टीम इंडिया ला सेमीफायनल गाठण्यासाठी सध्या केवळ एका विजयाची गरज आहे. पण भारताच्या विजयामुळे पाकिस्तान (Pakistan) आणि बांगलादेश (Bangladesh) यांनाही फायदा होणार आहे. भारताने इंग्लंड चा पराभव केला तरच पाक आणि बांगलादेशचे सेमीफायनलमध्ये जाण्याच्या आशा शिल्लक राहतील. त्यामुळे दोन्ही संघाचे लक्ष या सामन्यावर असेल. (ICC World Cup 2019: माइकल वॉन म्हणाला जो कोणी या संघाचा पराभव करेल तोच विश्वकप चा खरा दावेदार)
याचाच एक भन्नाट पुरावा म्हणजे एक नवीन 'मौका-मौका' ची जाहिरात सोशल मीडिया वर वायरल होत आहे. यात भारत आणि पाकिस्तानचे चाहते यांच्यातील संवाद दाखवण्यात आला आहे. पाकिस्तान चाहता विचारतो, "इंग्लंड विरोधात हरणार तर नाही ना". यावर भारतीय चाहता चोख उत्तर देत म्हणतो,"1947 असो किंवा 2019 इंग्लंडच्या पराभवानंतरच पाकिस्तान येणार".
दरम्यान, गुणतालिकेत, गत जेता ऑस्ट्रेलिया 14 गुणांसह अव्वल स्थानी आहे. भारत 11 गुणांसह दुसऱ्या तर न्यूझीलंड 11 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. पाकिस्तानने अफगाणस्तान वर विजय मिळवल्यामुळे ते 9 गुणांसह चौथ्या स्थानावर आहेत. तर यजमान इंग्लंड संघ 8 गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. बांगलादेश 7 गुणांसह सहाव्या स्थानावर आहे. इंग्लंड विरुद्ध विजय मिळवल्यास टीम इंडिया सेमीफायनलमध्ये प्रवेश करेल.