INDW vs ENGW, Women's T20 World Cup Semi Final: भारतीय महिला क्रिकेट संघाचा फायनलमध्ये प्रवेश; आसीसीच्या 'या' नियमामुळे इंग्लंड पराभूत
भारतीय महिला क्रिकेट संघ (Photo Credit: Twitter/ICC)

महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील (Women's T20 World Cup 2020) भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सेमीफाइनल सामना रद्द झाल्याने भारतीय महिला क्रिकेट संघाने फायनलमध्ये धडक दिली आहे. हा सामना सिडनी क्रिकेट मैदानात खेळण्यात येणार होता. आसीसीच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यास गुणतालिकेत अव्वल असणाऱ्या संघाला फायनलमध्ये प्रवेश मिळतो. या स्पर्धेत भारतीय संघ 'अ' गटात तर, दक्षिण आफ्रिकेचा संघ 'ब' गटात अव्वल स्थानी आहेत. या स्पर्धेत भारतीय संघाने एकही सामना न गमल्याने त्याच्या फायदा त्यांना मिळाला आहे. तसेच महिला टी-20 विश्वचषक 2020 मधील दुसरा सेमीफायनलऑस्ट्रेलिया विरूद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात होणार आहे. हा सामाना याच मैदानात खेळला जाणार आहे. जर दुसऱ्या सामन्यातही पावसाचे सावट राहिले तर, याचा फायदा दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मिळणार. भारतीय संघाने फायनलमध्ये जागा निश्चित असून भारतीय संघापुढे कोणत्या संघाचे आव्हान असणार आहे? हे पाहणे तितकेच गरजेचे आहे.

महिला टी-20 विश्वचषक 2020 मध्ये भारतीय संघाने साखळी फेरीतील सर्व सामने जिंकले आहेत. यामुळे भारतीय संघाने फायनलमध्ये जाणारा पहिल्या संघाचा मान पटकावला. इंग्लंडला साखळी फेरीत एका सामन्यात पराभवाचा स्वीकारावा लागला होता. पण इतर सामन्यांत केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडने सेमीफायनलमध्ये धडक मारली होती. या स्पर्धेत भारतीय संघ अजिंक्य आहे. परंतु,  इंग्लंडने विश्वचषक 2009, 2012, 2014, 2016 आणि 2018 दरम्यान भारताला पराभूत केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात कोणता संघ वरचढ ठरतो? याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. पण अखेर पावसामुळे सामना होऊ शकला नाही आणि इंग्लंडच्या संघाचे आव्हान संपुष्टात आले. हे देखील वाचा- SA vs AUS 2nd ODI 2020 Live Streaming: दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया वनडे सामना लाईव्ह आणि स्कोर पहा Sony SIX वर

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, याच मैदानावर दुपारी ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात महिला टी-20 विश्वचषक 2020  मधील दुसरा सेमीफायनल खेळला जाणार आहे. हा सामना पावसामुळे रद्द झाल्यास आसीसीच्या नियमाच्या आधारे आफ्रिकेचा संघ फायनलमध्ये प्रवेश करेल. जर सामना झाला तर विजेता संघ 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर भारताविरुद्ध विजेतेपदासाठी लढत देईल.