यंदाच्या आईसीसी क्रिकेट वर्ल्ड कप (ICC Cricket World Cup) सामन्यासाठी पाकिस्तान (Pakistan) संघातील खेळाडूंची नावे जाहीर करण्यात आली. मात्र संघात वेगवान गोलंदाज जुनेद खान (Junaid Khan) याला संघात स्थान न दिल्याने तो नाराज आहे. त्यामुळे आपली नाराजगी व्यक्त करण्यासाठी एका फोटोमध्ये तोंडावर काळी पट्टी लावून विरोध करताना दिसून येत आहे.
तर जुनेद याने ट्वीट करत असे म्हटले आहे की, मला काही नको. सत्य हे कटू असते. मात्र जुनेदने हे ट्वीट केल्यानंतर त्याने ते अकाउंटवरुन हटवले आहे.(पाकिस्तान फलंदाज आसिफ अली याच्या दोन वर्षाच्या मुलीचे कॅन्सरमुळे निधन)
Bring back junaid Khan 😑😤🤬🤬🤬🤬 pic.twitter.com/XDfkPIG2gR
— Ihtisham ul Haq (@iihtishamm) May 20, 2019
Pakistan finalises make-up of World Cup squadhttps://t.co/I4xFbvC5sF #WeHaveWeWill pic.twitter.com/tTdA8iC6Pj
— Pakistan Cricket (@TheRealPCB) May 20, 2019
दरम्यान संघाचे मुख्य प्रमुख इंजामाम उल हक यांनी सोमवारी 15 खेळाडूंच्या संघाची घोषणा केली आहे. तर संघात वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिर आणि वहाब रियाज यांना स्थान देण्यात आले आहे. मात्र आबिद अली आणि जुनेद खान यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. जुनेद खान यानो आता पर्यंत पाकिस्तानच्या संघातून 76 एकदिवशीय सामन्यामध्ये 110 विकेट्स घेतल्या आहेत.