India Women's National Cricket Team vs Australia Women's National Cricket Team 18th Match: 2024 आयसीसी महिला टी-20 विश्वचषकाचा 18 वा सामना (2024 ICC Women’s T20 World Cup) आज म्हणजेच 13 ऑक्टोबर रोजी भारतीय महिला राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघ यांच्यात शारजाहमधील शारजाह क्रिकेट स्टेडियमवर (Sharjah Cricket Stadium) संध्याकाळी 7.30 वाजल्यापासून खेळवला जाईल. ॲलिसा हिली या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व करत आहे. तर टीम इंडियाची कमान हरमनप्रीत कौरकडे सोपवण्यात आली आहे. आजचा सामना टीम इंडियासाठी खूप महत्त्वाचा आहे. टीम इंडियाला सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के करायचे असेल तर ऑस्ट्रेलियाला पराभूत करावे लागेल.
हेड टू हेड रेकॉर्ड
टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाला मोठा फायदा झाला आहे. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 34 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियाने 25 वेळा विजय मिळवला आहे, तर भारताने केवळ आठ वेळा विजय मिळवला आहे. एक सामना निकालाविना संपला. गेल्या 5 वर्षात टी-20 विश्वचषकात दोन्ही संघांमध्ये 19 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत ऑस्ट्रेलियन संघाने 14 सामने जिंकले आहेत.
आजच्या स्पर्धेत होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम
ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000 धावा पूर्ण करण्यासाठी 10 धावांची गरज आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाची स्टार अष्टपैलू खेळाडू ताहलिया मॅकग्राला 2000 धावा पूर्ण करण्यासाठी 75 धावांची गरज आहे.
ऑस्ट्रेलियाची घातक गोलंदाज मेगन शुटला आयसीसी महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेत 50 बळी पूर्ण करण्यासाठी 3 बळींची गरज आहे.
दोन्ही संघांच्या संभाव्य प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
टीम इंडिया : स्मृती मानधना, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्ज, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सजीवन सजना, अरुंधती रेड्डी, श्रेयंका पाटील, रेणुका सिंग ठाकूर, आशा शोभना.
ऑस्ट्रेलिया : ॲलिसा हिली (कर्णधार आणि विकेटकीपर), बेथ मूनी, जॉर्जिया वेअरहॅम, एलिस पेरी, ऍशले गार्डनर, फोबी लिचफिल्ड, ताहलिया मॅकग्रा, ॲनाबेल सदरलँड, ग्रेस हॅरिस, सोफी मोलिनक्स, मेगन शूट.