PAK vs ENG 1st Test Multan: पाकिस्तानविरुद्ध मुलतान येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत हॅरी ब्रूकने त्रिशतक झळकावून (Harry Brook Triple Century) इतिहास रचला. ब्रूकने 310 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले. या काळात त्याच्या बॅटमधून 28 चौकार आणि 3 षटकार आले. भारताचा माजी फलंदाज वीरेंद्र सेहवागनंतर (Virender Sehwag) कसोटीतील हे दुसरे सर्वात जलद त्रिशतक आहे. सेहवागने चेन्नईत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटी इतिहासातील सर्वात जलद शतक झळकावले. वीरूने अवघ्या 278 चेंडूत त्रिशतक पूर्ण केले होते. आता या यादीत हॅरी ब्रूक दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ब्रूकने 310 चेंडूत हा पराक्रम केला.
इंग्लंडकडून त्रिशतक झळकावणारा ठरला तिसरा फलंदाज
इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतक झळकावणारा ब्रूक हा सहावा फलंदाज ठरला. याआधी लेन हटन, वॅली हॅमंड, ग्रॅहम गूच, अँडी सँडहॅम आणि जॉन एडरिच यांनी इंग्लंडकडून कसोटीत त्रिशतके झळकावली होती. पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीत त्रिशतक झळकावणारा ब्रूक हा इंग्लंडचा पहिला फलंदाज ठरला. (हे देखील वाचा: Joe Root Stats And Record: पाकिस्तानविरुद्ध 'जो रूट'ची शतकी खेळी ठरली ऐतिहासिक; दिग्गज खेळाडूंचाही विक्रम मोडला)
Remarkable. Outstanding. Sensational.
Harry Brook brings up his triple-century in Multan 💯💯💯
🔝 An unbelievable achievement from an incredible player and person. #PAKvENG pic.twitter.com/d4n11MezjW
— England's Barmy Army 🏴🎺 (@TheBarmyArmy) October 10, 2024
कसोटीत सर्वात जलद त्रिशतक झळकवणारे फलंदाज (चेंडूंच्या बाबतीत)
278 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध दक्षिण आफ्रिका, चेन्नई, 2008
310 चेंडू - हॅरी ब्रूक विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2024
362 चेंडू - मॅथ्यू हेडन विरुद्ध झिम्बाब्वे, पर्थ, 2003
364 चेंडू - वीरेंद्र सेहवाग विरुद्ध पाकिस्तान, मुलतान, 2004
381 चेंडू - करुण नायर विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2016
389 चेंडू - डेव्हिड वॉर्नर विरुद्ध पाकिस्तान, ॲडलेड, 2019
393 चेंडू - ख्रिस गेल विरुद्ध श्रीलंका, गॅले, 2010.
ब्रूक आणि रूट यांनी इंग्लंडसाठी केली सर्वात मोठी भागीदारी
मुलतान कसोटीत हॅरी ब्रूक आणि जो रूट यांनी इतिहास रचला आणि इंग्लंडसाठी सर्वात मोठी कसोटी भागीदारी करण्याचा विक्रम केला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी 454 धावांची (522 चेंडू) भागीदारी केली, जी इंग्लंडसाठी कसोटीतील सर्वात मोठी भागीदारी (रन्सच्या बाबतीत) होती. याआधी इंग्लंडसाठी कसोटीत सर्वात मोठी भागीदारी करण्याचा विक्रम ग्रॅमी फॉलर आणि माइक गॅटिंगच्या नावावर होता, ज्यांनी 1957 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात चौथ्या विकेटसाठी 411 धावांची भागीदारी केली होती.