Joe Root (Photo Credit - X)

PAK vs ENG 1s Test: इंग्लंडचा दिग्गज फलंदाज जो रूटचा (Joe Root) उत्कृष्ट फॉर्म कायम आहे. पाकिस्तानविरुद्ध मुलतानमध्ये (Multan) खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीत रूटने इतिहास रचला आहे. जो रूट इंग्लंडकडून कसोटीत सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला आहे. त्याने ॲलिस्टर कूकला मागे टाकले. याशिवाय जो रूटने या सामन्यात आपल्या कसोटी कारकिर्दीतील 35 वे शतक झळकावले, यासह त्याने अनेक मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत. (हे देखील वाचा: Most Runs for England in Tests: ज्यो रूट ठरला कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा ठरला खेळाडू; पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी दरम्यान केली कामगिरी)

दिग्गज खेळाडूंचाही विक्रम मोडला

त्याने सर्वाधिक शतकांच्या बाबतीत सुनील गावस्कर, महेला जयवर्धने, ब्रायन लारा आणि युनूस खान यांना मागे टाकले. गावस्कर, जयवर्धने, लारा आणि युनूस खान यांच्या नावावर 34-34 शतके आहेत. रुट हा इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी धावा करणारा फलंदाज ठरला. त्याने माजी कर्णधार ॲलिस्टर कूकला मागे टाकले. कुकच्या नावावर कसोटीत 12472 धावा होत्या.

जो रूटने अनेक मोठे विक्रम कोढले मोडीत

2024 मध्ये सर्वाधिक कसोटी शतके

05 – कामिंदू मेंडिस

05 – जो रूट

घराबाहेर इंग्लंडसाठी सर्वाधिक कसोटी शतके

18 – ॲलिस्टर कुक (136 डाव)

14 – जो रूट (131 डाव)*

14 – केन बॅरिंग्टन (58 डाव)

13 - कॉलिन काउड्री (100 डाव)

13 – वॅली हॅमंड (72 डाव)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके

51 – सचिन तेंडुलकर

45 – जॅक कॅलिस

41 – रिकी पाँटिंग

38 – कुमार संगकारा

36 – राहुल द्रविड

35 – जो रूट*

34 – सुनील गावस्कर/ब्रायन लारा/महेला जयवर्धने/युनिस खान

इंग्लंडसाठी सर्वाधिक धावा (कसोटी)

जॅक हॉब्स (5410)

वॅली हॅमंड (7249)

कॉलिन काउड्री (7624)

जिऑफ बॉयकॉट (8114)

डेव्हिड गोवर (8231)

ग्रॅहम गूच (8900)

ॲलिस्टर कुक (12472)

जो रूट (12481*)

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा

15921 - सचिन तेंडुलकर

13378 - रिकी पाँटिंग

13289 - जॅक कॅलिस

13288 - राहुल द्रविड

12473* - जो रूट

12472 - ॲलिस्टर कुक