आयपीएल 2024 च्या निमित्ताने खेळाडूंची निवड सध्या चर्चेत आहे. अशात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) पुन्हा एकदा मुंबई इंडियन्स संघात परतला आहे. आगामी IPL 2024 साठी मुंबई इंडियन्समध्ये (Mumbai Indians) तो पुन्हा सहभागी होणार असल्याची घोषणा नीता एम. अंबानी यांनी केली. ही घोषणा होताच एमआय (MI) आणि चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायाला मिळते आहे. मुंबई इंडियन्स आणि हार्दिक पंड्या यांचे परस्परांच्या आयपीएल कारकीर्दीच्या वाटचालीत मोठा वाटा राहिला आहे. पंड्याचे सुरुवातीचे दिवस ते स्टार खेळाडू हा प्रवास विशेष करुन मुंबईइंडियन्ससोबतच झाला आहे. त्यामुळे त्याच्या आगमनाला विशेष म्हतत्त्व आहे.
नीता एम. अंबानी यांनी हार्दिक पांड्या याच्या नावाची घोषणा करताना म्हटले की, आम्ही हार्दिकचे स्वगृही स्वागत करताना रोमांचित झालो आहोत! आमच्या मुंबई इंडियन्स कुटुंबासोबत हे एक हृदयस्पर्शी पुनर्मिलन आहे! मुंबई इंडियन्सचा एक तरुण प्रतिभावंत होण्यापासून ते आता टीम इंडियाचा स्टार बनण्यापर्यंत, हार्दिक आमच्या संघाचा हिस्सा राहिला आहे. मुंबई इंडियन्समधील त्याच्या आगामी खेळीबद्दल आम्ही उत्साही आहोत." (हेही वाचा, Hardik Pandya Back To MI: हार्दिकचे मुंबई संघातील पुनरागमनानंतर आकाश अंबानी यांची खास पोस्ट; म्हणाला...')
आकाश अंबानी यांनीही हार्दिकच्या पुनरागमनावर बोलताना आनंद व्यक्त केला. “आनंदी घरवापसी” म्हणत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हार्दिक ज्या संघात जातो. त्या संघात जातो त्या संघाला तो यशस्वीपणे सर्वस्व देण्याचा प्रयत्न करतो. सुरुवातीपासूनच एमआय कुटुंबासोत त्याचा प्रारंभीचा काळ अत्यंत यशस्वी राहिला आहे. त्याने संघाच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे.
दरम्यान, हार्दिक पंड्याचे मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन हे #One Family मध्ये घरवापसीचे प्रतीक मानले जात आहे. चाहत्यांना रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, इशान किशन आणि उर्वरित संघासारख्या क्रिकेट दिग्गजांसह पुन्हा एकत्र खेळताना पाहायला मिळू शकते. सुरुवातीला MI सह प्रसिद्धी मिळविल्यानंतर, हार्दिकने 2016 मध्ये टीम इंडियात पदार्पण केले आणि 2015 आणि 2021 दरम्यान फ्रँचायझीच्या चार IPL विजयांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
एक्स पोस्ट
Welcome back 𝗛𝗢𝗠𝗘! 💙 #OneFamily https://t.co/rrP5s36xn2
— Mumbai Indians (@mipaltan) November 27, 2023
रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह आणि इशान किशन यांसारख्या प्रमुख खेळाडूंचा समावेश असलेल्या खेळाडूंची यादी पाहिली तर, मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी खेळाडूंची एक मजबूत फळी उभारली आहे. फ्रँचायझी, इंडियाविन स्पोर्ट्स प्रा. लिमिटेड, रिलायन्स इंडस्ट्रीजची उपकंपनी, 2008 मध्ये सुरू झाल्यापासून MI आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक राहिला आहे.