टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आज आपला 31 वा वाढदिवस साजरा करीत आहे. आपल्या 11 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीत कोहलीने बरीच मोठे विक्रम आणि प्रभावी कामगिरी केली आहे. कोणतीही मोठी इंज्युरी न होऊ देता इतकी वेळ सतत क्रिकेट खेळणे ही फार मोठी गोष्ट आहे. कोहलीची शिस्तबद्ध आहार आणि त्याच्या वर्कआउट्समधूनही हे दिसून येते. जिममधील वर्कआउटबद्दल कोहली खूप जागरूक आहे. त्याला पाहिल्यानंतर टीमचे उर्वरित खेळाडू घाम गाळण्यासाठी जिममध्ये घालताना दिसले आहेत. सध्या विराटला क्रिकेटविश्वातील सर्वश्रेष्ठ फलंदाज आहे ज्यामुळे त्याला 'रनमशीन' (Run Machine) च्या नावाने देखील बोलावले जाते. टेस्ट असो किंवा वनडे, विराट वेगाने धावा करण्यात विश्वास करतो. क्रिकेटविश्वात आज कोहलीला टक्कर देई असा कोणताही फलंदाज नाही. (IND vs SA 2nd Test Day 2: दक्षिण आफ्रिकाविरुद्ध विराट कोहली याचे रेकॉर्ड 7 वे दुहेरी शतक, डॉन ब्रॅडमन देखील राहिले मागे)

31 वर्षीय या भारतीय क्रिकेटपटूने त्याच्या शानदार फलंदाजीने टीम इंडिया आणि स्वतःला क्रिकेटच्या शिखरावर नेऊन पोहचवले आहेत. शिवाय, क्रिकेटमध्ये नवीन विक्रम करणाऱ्या विराटसाठीही हे वर्ष चांगले सिद्ध झाले आहेत. क्रिकेटमध्ये अशे रेकॉर्ड आहे ज्यांपर्यंत पोहचणे काही काळापूर्वी अशक्य वाटायचे, अशाच रेकॉर्ड्सना "मॉडर्न मास्टर-ब्लास्टर" विराटने मोडीत काढले आहे. विराटचे हे रेकॉर्ड्स पाहून आपणही स्तब्ध व्हाल. त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पहा - यावर्षी कोणत्या विक्रमांवर विराटने आपले नाव लिहिले आहे…

1. नुकत्याच संपुष्टात आलेल्या दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टेस्ट मालिकेतील सामन्यात विराटने 2019 मधील पहिले कसोटी शतक ठोकले. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थच्या मैदानावर डिसेंबर 2018 मध्ये शेवटचे शतक झळकावणाऱ्या कोहलीने आफ्रिकाविरुद्ध पुणे कसोटीच्या दुसर्या दिवशी दहा डावांनंतर शतकाचा दुष्काळ संपवला. यासह कसोटी सामन्यात 26 शतकं करणारा विराट जगातील 21 वा खेळाडू आणि भारताचा चौथा खेळाडू बनला आहे. शिवाय, टेस्टमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा विराट 7 वा फलंदाज ठरला.

2. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये भारतीय संघाला (Indian Team) सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडकडून पराभव पत्करावा लागला. पण, विराटसाठी ही स्पर्धा संस्मरणीय राहिली. इंग्लंडविरुद्ध ग्रुप लीग सामन्यात विराटने विश्वचषकयामध्ये सलग 5 अर्धशतक कारणाच्या विक्रमाची नोंद केली. शिवाय, इंग्लंडमध्ये कोहलीने 11 वेळा 50 धावांचा टप्पाही ओलांडला.

3. मॅन्चेस्टरमध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वात कमी डावात 20,000 धावा पूर्ण केल्या. यासह कोहलीने सचिन तेंडुलकर आणि वेस्ट इंडीजचा माजी कर्णधार ब्रायन लारा यांचा विक्रम मोडला. सचिन आणि लाराने 457 व्या डावात 20 हजार धावा पूर्ण केल्या होत्या, तर 417 व्या डावात कोहलीने हा टप्पा गाठला.

4. वनडेसहआंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये विराटने आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. यंदा दक्षिण आफ्रिकाविरुद्ध टी-२० सामन्यात कोहलीने 'हिटमॅन' रोहित शर्मा याला पछाडत ट्वेंटी-२० मध्ये सर्वाधिक धावांची नोंद केली.

5. आंतरराष्ट्रीय क्रिकेटव्यतिरिक्त विराटने आपले वर्चस्व कायम ठेवत आयपीएलच्या कारकीर्दीत 5000 धावा पूर्ण केल्या आहेत. विराट आयपीएल संघ रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा कर्णधार आहे. हे स्थान मिळविणारा तो दुसरा भारतीय फलंदाज बनला आहे. सुरेश रैना ही कामगिरी बजावणारा पहिला फलंदाज आहे. ही कामगिरी गाठण्यासाठी कोहलीने 34 अर्धशतकं केली आहेत.

6. विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने प्रभुत्व राखले. 2018-19 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान भारताने पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाई भूमीवर टेस्ट मालिकेत विजयाची नोंद केली आणि नवीन इतिहासाची रचना केली.

7. विराटला एका विशेष कारणामुळे 'रनमशीन' म्हटले जाते. क्रिकेटविश्वात आज असा कोणताही विक्रम नाही ज्याला विराटने आपल्यानावावर नाही केले. मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकर यासाजे रेकॉर्ड मोडण्यापासून ते नव्या रेकॉर्डची निर्मिती करेपर्यंत कोहली सर्वात वेगवान फलंदाज ठरला आहे. दक्षिण आफ्रिकाविरुद्ध पुणे टेस्टदरम्यान आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वेगवान 21,000 धावा करणारा कोहली जगातील पहिला फलंदाज ठरला. विराटने 392 सामन्यांमध्ये हा टप्पा गाठला. यापूर्वी, माजी विंडीज क्रिकेटपटू ब्रायन लारा याने 396 सामन्यात, तर तेंडुलकरने 418 मॅचमध्ये ही कामगिरी केली होती.

8. भारताने दक्षिण आफ्रिकेला डाव आणि 202 धावांनी पराभूत करून तीन सामन्यांची कसोटी मालिका 309 ने जिंकली. यासह भारताने सलग 11 घरांची कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रमही केला. 2012-13 पासून भारतीय संघ घरच्या कसोटी मालिकेत अजय राहिला आहे. यापूर्वी घरच्या मैदानावर सलग सर्वाधिक कसोटी मालिका जिंकण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर होता. ऑस्ट्रेलियाने 1994/95 - 2000/01 आणि 2004 - 2008/09 दरम्यान सलग 10-10 कसोटी मालिका जिंकल्या होत्या.

प्रत्येक सामन्यासह विराट एका नवीन विक्रमाची नोंद करत आहे. आज त्याच्या सारखी किंवा त्याला आव्हान देणारा एकही फलंदाज क्रिकेट जगतात नाही आहे. आणि सध्या विराटची फिटनेस पाहता तो आणखी काही वर्ष खेळेल आणि विश्वातील सर्वश्रेष्ठ क्रिकेटपटू सिद्ध होईल असे म्हटले जात आहे.