PC-X

आयपीएल 2025 चा 9 वा सामना शनिवार 29 मार्च रोजी मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) विरुद्ध गुजरात टायटन्स (Gujrat Titans) यांच्यात खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरातचे सलामीवीर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी पहिल्या विकेटसाठी 76 धावांची भागीदारी केली. मात्र, यानंतर जोस बटलरनेही 24 चेंडूत 39 धावांची खेळी केली. तथापि, 19 व्या षटकात, जीटीने सलग दोन विकेट गमावल्या. त्यामुळे आशिष नेहरा (Ashish Nehra) रागाने लाल झाला आणि त्याने सर्वांसमोर त्याच्या संघातील खेळाडूंवर ओरडण्यास सुरुवात केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला.