गॅरी कर्स्टन व दक्षिण आफ्रिकेच्या सहाय्यक कर्मचाऱ्यांसाठी एमएस धोनीने घेतला होता आयोजकांशी पंगा, टीम इंडियाचे माजी प्रशिक्षकाने सांगितला किस्सा
गॅरी कर्स्टन आणि एमएस धोनी (Photo Credit: Getty)

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक-फलंदाज महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार आहे. धोनीच्या नेतृत्वात भारताने देश-विदेशात बऱ्याच संस्मरणीय विजयांची नोंद केली आहे. कौशल्यपूर्ण नेतृत्व आणि दबावात शांत राहण्याची क्षमता यामुळे त्याने भारतासाठी अनेक सामने जिंकले आहेत. पण, धोनीबद्दल कधी न ऐकलेला किस्सा भारताचे माजी प्रशिक्षक आणि दक्षिण आफ्रिकेचे माजी क्रिकेटपटू गॅरी कर्स्टन (Gary Kirsten) यांनी नुकताच यूट्यूबच्या 'आरके शो' सांगितला. कर्णधार म्हणून धोनीचा सुवर्णकाळ हा भारतीय संघाचे (Indian Team) माजी प्रशिक्षक कर्स्टन यांच्या कार्यकाळात होता. कर्स्टन यांच्या कार्यकाळात धोनीने 2010 मध्ये प्रथम संघ आशिया चषक जिंकला होता आणि यानंतर देशाने 28 वर्षांनंतर विश्वचषक जिंकला ज्याची प्रतीक्षा प्रत्येक भारतीय करत होता. (MS Dhoni Retirement: एमएस धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या मॅनेजरने दिली मोठी अपडेट, पाहा काय म्हणाले)

धोनीच्या निष्ठेवर प्रकाश टाकत गॅरी कर्स्टन यांनी 2011 वर्ल्ड कपच्या आधीपासूनच एक अविस्मरणीय घटना सांगितली ज्यामध्ये टीम इंडियाला बेंगळुरूच्या एअर स्कूलमध्ये टीम ट्रिपसाठी आमंत्रित केले गेले होते. मात्र, कर्स्टन आणि दक्षिण आफ्रिकेच्या अन्य दोन सहाय्यक कर्मचार्‍यांना संभाव्य सुरक्षा धोका म्हणून पाहिले जात असल्याने त्यांना प्रवेश देता येणार नाही हे कळल्यानंतर धोनीने संपूर्ण ट्रिप रद्द केला, असे भारताच्या माजी वर्ल्ड कप विजेत्या प्रशिक्षकाने सांगितले. हा किस्सा आठवत कर्स्टन म्हणाले, "विश्वचषक होण्यापूर्वी मी कधीच विसरणार नाही, आम्ही बंगलोरमध्ये होतो आणि तेथील फ्लाइट स्कूलमध्ये जायचे होते. आमच्या सहाय्यक कर्मचार्‍यांमध्ये आमच्याकडे दोन परदेशी होते आणि सकाळीच आम्हाला हे समजले की तीन दक्षिण आफ्रिकन लोकांनासुरक्षा जोखीम म्हणूनउड्डाण शाळेत प्रवेश घेता येणार नाही. तर एमएसने संपूर्ण कार्यक्रम रद्द केला." तो फक्त म्हणाला, "ही माझी लोकं आहेत, जर त्यांना परवानगी नसेल तर आमच्यापैकी कोणीही जाणार नाही."

धोनीने दक्षिण आफ्रिकेत टी-20 वर्ल्ड कप जिंकल्याच्या काही महिन्यांनंतर डिसेंबर 2007 मध्ये कर्स्टन यांनी संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले होते. कर्स्टनच्या नेतृत्वात भारत कसोटीतील पहिल्या क्रमांकावर पोहचला आणि 2011 वर्ल्ड कप जिंकला. दरम्यान, वर्ल्ड कप विजयानंतर कर्स्टन यांनी भारताच्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.