भारतीय संघाने (Indian Team) वेस्ट इंडिजविरूद्ध वनडे मालिका जिंकून वर्षांचा शेवट गोड केला. आणि टीम इंडिया येणारे नवीन वर्ष आक्रामक पद्धतीने सर्वतोपरी प्रयत्न करेल. उद्यापासून टीम इंडियाचा मिशन 2020 सुरु होणार आहे. यावर्षी भारतीय संघासाठी सर्वात मोठे आव्हान ऑस्ट्रेलिया (Australia) मध्ये होणारा टी-20 विश्वचषक आहे. टी-20 विश्वचषकमध्ये टीम इंडिया 24 ऑक्टोबर 2020 रोजी दक्षिण आफ्रिकेविरूद्ध आपली मोहीम सुरू करणार आहे. विश्वचषक मिशनपूर्वी भारतीय संघाला श्रीलंका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंडविरुद्ध तिन्ही फॉर्मेटमध्ये सामने खेळावे लागणार आहे. भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात विराट कोहली याची टीम इंडिया श्रीलंके (Sri Lanka) विरूद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेपासून करेल. मालिकेचा पहिला सामना 5 जानेवारीला गुवाहाटी स्टेडियममध्ये खेळला जाईल. (ICC Test Rankings: विराट कोहली, पॅट कमिन्स यांचे अव्वल स्थान कायम; क्विंटन डी कॉक याने घेतली मोठी झेप)
वर्ष 2019 मध्ये क्रिकेट विश्वाला वनडेचा चॅम्पियन संघ मिळाला आणि आता पुढील वर्षी, 2020 मध्येही क्रिकेट संघ दुसर्या वर्ल्ड चॅम्पियन जेतेपदासाठी भिडतील आणि ही स्पर्धा टी-20 विश्वचषकची असेल. नवीन वर्ष सुरू होण्यापूर्वी, आपण पाहूया की टीम इंडियाला कोणत्या देशाविरुद्ध खेळायचे आहे. यात विशेष म्हणजे वर्षाच्या सुरुवातीलाच भारतीय संघ तब्बल 10 सामने खेळणार आहे.
श्रीलंकेचा भारत दौरा
5 जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, पहिला टी-20, गुवाहटी संध्याकाळी 7 वाजता
7 जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, दूसरा टी-20, इंदोर संध्याकाळी 7 वाजता
10 जानेवारी, भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरा टी-20, पुणे संध्याकाळी 7 वाजता
ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा
14 जानेवारी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, पहिला वनडे, मुंबई दुपारी, 2 वाजता
17 जानेवारी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, दुसरा वनडे, राजकोट दुपारी, 2 वाजता
19 जानेवारी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, तिसरा वनडे, पुणे, दुपारी2 वाजता
भारताचा न्यूझीलंड दौरा
24 जानेवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिला टी-20, ऑकलँड, दुपारी 12.30 वाजता
26 जानेवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुसरा टी-20,ऑकलँड, दुपारी 12.30 वाजता
29 जानेवारी,न्यूझीलंड विरुद्ध भारत, तिसरा टी-20, हॅमिल्टन, दुपारी 12.30 वाजता
31 जानेवारी,न्यूझीलंड विरुद्ध भारत, चौथा टी-20, वेलिंग्टन, दुपारी 12.30 वाजता
2 फेब्रुवारी,न्यूझीलंड विरुद्ध भारत, पाचवा टी-20, माउंट माउंगानुई, दुपारी 12.30 वाजता
5 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिला वनडे,हॅमिल्टन, सकाळी 7.30 वाजता
8 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुसरा वनडे,ऑकलँड, सकाळी 7.30 वाजता
11 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, तिसरा वनडे,माउंट माउंगानुई, सकाळी 7.30 वाजता
21-25 फेब्रुवारी, न्यूझीलंड विरुद्ध भारत, पहिला टेस्ट, वेलिंग्टन, सकाळी 4 वाजता
29 फेब्रुवारी -4 मार्च, न्यूझीलंड विरुद्ध भारत, दुसरा टेस्ट, ख्रिसचर्च, सकाळी 4 वाजता
दक्षिण आफ्रिकेचा भारत दौरा
12 मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, पहिला वनडे, धर्मशाळा, दुपारी 2 वाजता
15 मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दुसरा वनडे, लखनौ, दुपारी 2 वाजता
18 मार्च, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, तिसरा वनडे, कोलकाता, दुपारी 2 वाजता
एप्रिल-मे, आयपीएल 2020
जुलै 2020, भारताचा श्रीलंका दौरा (अद्याप निश्चित नाही)
सप्टेंबर, आशिया कप (अद्याप निश्चित नाही)
सप्टेंबर-ऑक्टोबर, इंग्लंडचा भारत दौरा; विश्वचषक 2020, ऑस्ट्रेलिया
टी-20 विश्वचषकमध्ये भारताचे सामने
24 ऑक्टोबर, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, सुपर 12, गट 2, पर्थ, सायंकाळी 4.30 वा
29 ऑक्टोबर, भारत विरुद्ध क्वालिफाइड टीम, सुपर 12, ग्रुप 2, मेलबर्न, दुपारी 1.30 वा
1 नोव्हेंबर, भारत विरुद्ध इंग्लंड, सुपर 12, गट 2, अॅडिलेड, दुपारी 1.30 वा
5 नोव्हेंबर, भारत विरुद्ध क्वालिफाइड टीम, सुपर 12, ग्रुप 2, मेलबर्न, दुपारी 2 वाजता
8 नोव्हेंबर, भारत विरुद्ध अफगाणिस्तान, सुपर 12, गट 2, सिडनी, दुपारी 1.30 वा
नोव्हेंबर-डिसेंबर
ऑस्ट्रेलियामध्ये बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी
पुढील वर्षी टी-20 विश्वचषक असेल आणि टीम इंडिया टी-20 सामन्यासह या वर्षाची सुरुवात करेल. नवीन वर्षी टीम इंडियासमोर मोठे कठीण संघाचे आव्हान असणार आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि इंग्लंडसारख्या मजबूत देशांविरुद्ध टीम इंडिया सामने खेळणार आहे.