Sanjay Manjrekar And Rohit Sharma (Photo Credit - Insta)

भारतीय संघ आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना (IND vs NZ 2nd ODI) 21 जानेवारी रोजी, रायपूर येथे खेळला जाईल. रोहित शर्मा आणि कंपनीने सामना जिंकण्यासाठी तयारी सुरू केली आहे. त्याचवेळी कर्णधार रोहित शर्माला बऱ्याच दिवसांपासून मोठी धावसंख्या करता आलेली नाही. त्यामुळेच माजी क्रिकेटपटू संजय मांजरेकर (Sanjay Manjrekar) यांनी रोहित शर्माच्या (Rohit Sharma) फॉर्मबाबत मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, रोहित-विराटसारखा खराब फॉर्ममध्ये नाही. कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्ध 83 धावांची इनिंग खेळली होती, पण त्याचे शतक हुकले. आणि आगामी विश्वचषकापूर्वी रोहित शर्माला चांगली कामगिरी करण्याची गरज आहे. विराट कोहली ज्याप्रकारे खराब फॉर्ममधून गेला आहे, तसा रोहित शर्मा फॉर्ममधून जात नाही असे माजी क्रिकेटला वाटत आहे. दुसरीकडे, दोन्ही स्टार खेळाडूंच्या तुलनेबाबत संजय यांनी अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे.

स्टार स्पोर्ट्सशी संवाद साधताना संजय मांजरेकर म्हणाले की, “मला कळत नाही की रोहित शर्मा मोठी धावसंख्या का करू शकत नाही. तो चांगली फलंदाजी करत नसल्याचे स्पष्ट संकेत मला दिसत नाहीत. आपण विराट कोहलीसोबत पाहिल्याप्रमाणे, तो ज्या प्रकारचा फॉर्म त्याच्याकडून अपेक्षित होता किंवा गेल्या काही वर्षांत त्याच्याकडून पाहिला होता तसा तो नव्हता. जरी तो त्याच्या फॉर्ममध्ये परतला आहे. रोहित शर्माही चांगले फटके खेळत आहे. आम्ही त्याला श्रीलंकेविरुद्ध 30-40 किंवा 70-80 धावा करताना पाहिले आहे. मात्र शतकापासून दूर राहिला. (हे देखील वाचा: IND vs NZ 2nd ODI: न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात रोहित शर्मा मोडू शकतो 'या' पाकिस्तानी दिग्गजाचा विक्रम, पहा आकडेवारी)

ते पुढे म्हणाला की माझा विश्वास आहे की “जोपर्यंत टीम इंडिया 350 किंवा त्याहून अधिक धावा करत आहे, तोपर्यंत मला त्यांनी शतके न ठोकण्यात कोणतीही अडचण नाही. तो केव्हाही शतक करू शकतो कारण तो खराब फॉर्ममध्ये आहे की खेळण्यासाठी तो संघर्ष करत आहे हे स्पष्ट होत नाही.