New Zealand National Cricket Team vs England National Cricket Team, 2nd Test Day 1 Scorecard: न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ विरुद्ध इंग्लंड राष्ट्रीय क्रिकेट संघ 3 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून म्हणजेच 6 डिसेंबरपासून खेळला जात आहे. उभय संघांमधील हा सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह येथे खेळला जात आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटीत इंग्लंडने शानदार विजयाची नोंद करत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दरम्यान, इंग्लडचा पहिला डाव 280 धावावर गारद झाला आहे. इंग्लडकडून हॅरी ब्रूक 123 आणि ओली पोपने 66 धावांची सर्वाधिक खेळी केली. तर न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथ सर्वाधिक 4 विकेट घेतल्या.
England’s last three wickets tumble for 21 runs after tea - all out in 54.4 overs!https://t.co/FUY1BFkHUW | #NZvENG pic.twitter.com/0Kh0b0OUV7
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) December 6, 2024
येथे पाहा स्कोरकार्ड
त्याआधी, दुसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार टॉम लॅथमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या इंग्लंड संघाची सुरुवात निराशाजनक झाली आणि अवघ्या 43 धावांवर संघाचे चार फलंदाज पॅव्हेलियनमध्ये परतले. यानंतर हॅरी ब्रूक आणि ऑली पोप यांनी मिळून डावाची धुरा सांभाळली आणि संघाची धावसंख्या 200 च्या पुढे नेली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत इंग्लंडचा पहिला डाव 54.4 षटकांत 280 धावांवर आटोपला होता.
हॅरी ब्रूकची तुफानी खेळी
इंग्लंडकडून हॅरी ब्रूकने 115 चेंडूत 11 चौकार आणि पाच षटकारांच्या मदतीने 123 धावांची तुफानी खेळी केली. हॅरी ब्रूकशिवाय ऑली पोपने 66 धावा केल्या. दुसरीकडे, मॅट हेन्रीने न्यूझीलंड संघाला पहिले मोठे यश मिळवून दिले. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. नॅथन स्मिथशिवाय विल्यम ओरूर्कने तीन आणि मॅट हेन्रीने दोन बळी घेतले. न्यूझीलंड संघाला पहिल्या डावात आघाडी घ्यायला आवडेल.