Kamal Kaur | (Photo Credit- Instagram)

सोशल मीडिया प्रभावक (Instagram Influencer) कमल कौर (Kamal Kaur Death) हिचा मृत्यू झाला आहे. बटिंडा-चंदीगड राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या आदेश वैद्यकीय विद्यापीठ (Adesh Medical University, Bathinda) परिसरात उभ्या केलेल्या एका कारमध्ये तिचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला. कमल (Kamal Kaur) हिचे मूळ नाव कांचन कुमारी (वय 30) असे असून, ती मुळची लुधियानाची रहिवासी आहे. पोलिसांनी (Punjab Police) मृतदेह ताब्यात घेतला असून, चौकशी सुरु केली आहे. प्रथमदर्शनी ही हत्या असल्याचा संशय आहे. ही घटना बुधवारी (12 जून) रात्री उशिरा उघडकीस आली.

मृतदेह सडला, कारमधून दुर्गंधी

मूळची लुधियानाची रहिवासी असलेली कांचन कुमारी अर्थात कमल कौर ही सोशल मीडियावर प्रचंड प्रसिद्ध होती. सोशल मीडिया मंचावर तिचे 3.83 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियानामध्ये नोंदणीकृत असलेली ही गाडी आदेश वैद्यकीय विद्यापीठ परिसरात काही काळापासून एकाच ठिकाणी उभी होती. परिसरातून येणाऱ्या नागरिकांना दुर्गंधी येत होती. त्यामुळे त्यांनी पोलिसांना कळवले.

हिच ती सोशल मीडिया प्रभावक

कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्यापासून बेपत्ता

भटिंडाचे एसपी नरेंद्र सिंह यांनी माहिती देताना सांगितले की, आम्हाला रुग्णालयाच्या पार्किंगमध्ये एका थांबलेल्या कारमधून तीव्र वास येत असल्याची माहिती मिळाली. तपासणी केल्यानंतर, मागच्या सीटवर एका महिलेचा मृतदेह आढळला. मृत महिलेची नंतर कमल कौर म्हणून ओळख पटली, जी 9 जून रोजी भटिंडातील एका प्रमोशनल कार्यक्रमासाठी घराबाहेर पडल्यानंतर बेपत्ता झाली होती.

लहान मुलांसोबत सोशल मीडिया प्रभावक

 

 

 

 

View this post on Instagram

 

 

 

 

A post shared by Kanchan Kumari (@kamalkaurbhabhi)

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास

स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळले आहे की, विद्यापीठात संशयास्पद स्थितीत आढळून आलेली कार एक व्यक्ती घेऊन आला आणि नंतर त्या कारमधून उतरुन तो एकटाच चालत गेला आहे. ही व्यक्ती पोलीस तपासात महत्त्वाची ठरु शकते. प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की, कौरची हत्या इतरत्र झाली असावी आणि नंतर तिचा मृतदेह गाडीतच सोडून देण्यात आला असावा. वरिष्ठ पोलिस अधीक्षक अमनीत कोंडल यांनी सांगितले की पुरावे गोळा करण्यासाठी घटनास्थळी फॉरेन्सिक टीमला बोलावण्यात आले आहे. प्रथमदर्शनी, हा खटला संशयास्पद दिसत आहे. आम्ही तो खूनाचा गुन्हा म्हणून नोंदवत आहोत, कोंडल यांनी मीडियाला सांगितले.