Air India Plane Crash: अहमदाबादहून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान कसे कोसळले? समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताच कोसळले. या विमानाला अपघात कसा झाला याचा व्हिडिओही समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे.
Air India Plane Crash Update: गुजरातमधील अहमदाबाद विमानतळावरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे विमान उड्डाण घेताच कोसळले (Air India Plane Crash). या विमानात 242 प्रवासी होते. एअर इंडियाचे विमान लांब पल्ल्याच्या प्रवासाला निघाले होते. अशा परिस्थितीत विमानात भरपूर इंधन होते. विमानतळ परिसराजवळ विमानाला अपघात झाला. या विमानाला अपघात कसा झाला याचा व्हिडिओही (Air India plane Crash Video) समोर आला आहे. व्हिडिओमध्ये विमानाच्या ढिगाऱ्यातून धूर निघताना दिसत आहे.
अपघातानंतर विमान एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवर कोसळले. प्राप्त माहितीनुसार, सिव्हिल हॉस्पिटलजवळ ही दुर्घटना घडली. गृहमंत्री अमित शहा यांनी गुजरातच्या मुख्यमंत्र्यांना फोन करून घटनेची माहिती घेतली. दरम्यान, एनडीआरएफ टीम घटनास्थळी पोहोचली आहे आणि बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. अपघातानंतर अहमदाबाद विमानतळ काही काळासाठी बंद करण्यात आले आहे. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील अपघातग्रस्त विमानात होते. (हेही वाचा - Vijay Rupani: एअर इंडियाच्या AI171 विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी प्रवासी असल्याचे वृत्त)
दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, विमानात 242 लोक होते, ज्यात 2 पायलट आणि 10 केबिन क्रू होते. या विमानाचे नेतृत्व कॅप्टन सुमित सभरवाल करत होते आणि त्यांच्यासोबत फर्स्ट ऑफिसर क्लाईव्ह कुंदर होते. तथापि, एअर इंडियानेही विमान अपघाताची माहिती दिली आहे. (वाचा - Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे Air India कंपनीचे विमान कोसळले; विमानातील प्रवाशांमध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश)
एअर इंडिया विमान अपघाताचा व्हिडिओ -
WATCH: Air India plane carrying 242 people crashes in Ahmedabad while taking off for flight to London pic.twitter.com/KyLVZaV6i7
— BNO News (@BNONews) June 12, 2025
#WATCH | Debris at Air India plane crash site in Ahmedabad; Fire Services and other agencies present at the site
Air India B787 Aircraft VT-ANB, while operating flight AI-171 from Ahmedabad to Gatwick, has crashed immediately after takeoff from Ahmedabad. There were 242 people… pic.twitter.com/zn3ZMsJjCi
— ANI (@ANI) June 12, 2025
तथापि, अपघातग्रस्त विमान 11 वर्षे जुने होते. ते अमेरिकन कंपनी बोईंगने बनवले आहे. या विमानात अनेक धातूंचे मिश्रण आहे, ज्यामुळे त्याचे वजन खूप कमी आहे. म्हणूनच हे विमान लांब अंतर प्रवास करण्यास सक्षम आहे. यासोबतच त्याचा इंधन वापर देखील कमी आहे. म्हणूनच जगातील प्रत्येक मोठी विमान कंपनी या विमानाचा वापर करते. या विमानात सहसा 200-300 प्रवासी बसू शकतात.
(The above story first appeared on LatestLY on Jun 12, 2025 04:18 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

