
Ahmedabad Plane Crash: अहमदाबादहून टेकऑफ केल्यानंतर क्रॅश (Air India Flight Crash) झालेल्या एअर इंडिया फ्लाईट AI171 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी (Vijay Rupani) असल्याचे मानले जात आहे. अहमदाबादमधील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून (Sardar Vallabhbhai Patel International Airport) गुरुवारी (12 जून) दुपारी टेकऑफ केल्यानंतर काही वेळातच क्रॅश झालेल्या एअर इंडिया फ्लाईट AI171 मध्ये गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही समावेश असल्याचे वृत्त आहे. ही घटना घडली तेव्हा बोईंग 787-8 ड्रीमलायनर (Boeing 787 Dreamliner Crash) हे विमान लंडनमधील गॅटविक विमानतळाकडे जात होते. सुरुवातीच्या अहवालांमध्ये विमानात एकूण 230 प्रवासी आणि 12 क्रू मेंबर्ससह एकूण 242 जण प्रवास करत होते याची पुष्टी झाली आहे.
मृतांच्या संख्येबाबत अधिकृत माहिती नाही
विमान कोसळले आहे त्या परिसरातील दृश्यांमध्ये हवेत जाड काळा धूर पाहायला मिळत आहे, जे अपघाताची तीव्रता दर्शवतात. आपत्कालीन सेवांनी तातडीने मदत केली आणि सुरक्षितता आणि तपासासाठी परिसराला वेढा घातला गेला आहे. विमानातील प्रवाशांच्या प्रकृतीबाबत अद्याप कोणताही अधिकृत माहिती पुढे आली नाही. मदत आणि बचाव कार्य मोठ्या प्रमाणावस सुरु असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान, एअर इंडियाने एका अधिकृत निवेदनात या घटनेची पुष्टी केली आणि सविस्तर माहिती गोळा केली जात असल्याचे म्हटले आहे. (हेही वाचा, Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे Air India कंपनीचे विमान कोसळले; विमानातील प्रवाशांमध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश)
महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी
- 'अहमदाबाद-लंडन गॅटविक या मार्गावर चालणारी फ्लाइट AI171 ही आज, 12 जून 2025 रोजी घडलेल्या घटनेत सहभागी होती. सध्या, आम्ही तपशीलांची पडताळणी करत आहोत आणि लवकरच पुढील अपडेट्स शेअर करू,' असे एअर इंडियाने म्हटले आहे.
- आतापर्यंत मृतांची किंवा जखमींची अधिकृत पुष्टी झालेली नसली तरी, सूत्रांनी असे सूचित केले आहे की ऑगस्ट 2016 ते सप्टेंबर 2021 पर्यंत गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केलेले विजय रुपाणी हे दुर्दैवी विमानात बसलेल्या लोकांमध्ये असू शकतात.
- ऑनलाइन फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की AI171 दुपारी 1.10 वाजता अहमदाबादहून लंडन गॅटविकसाठी निघणार होते. अपघाताभोवतीची परिस्थिती अस्पष्ट आहे आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) सविस्तर चौकशी सुरू करेल अशी अपेक्षा आहे. (हेही वाचा, Plane Crash in Southern Mexico: दक्षिण मेक्सिकोमध्ये विमान अपघात; 3 जणांचा मृत्यू)
दरम्यान, पोलीस नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, एअर इंडियाचे विमान एआय 171 हे लंडनला जाणार होते. अपघातस्थळी धुराचे लोट दिसत होते आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. या प्रकरणाची अधिक माहिती मिळण्याची वाट पाहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विमान अपघाताच्या घटनेबाबत गुजरातचे मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पोलिस आयुक्तांशी बोलले आहे. त्यांनी केंद्र सरकारला मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.