Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे Air India कंपनीचे विमान कोसळले; विमानातील प्रवाशांमध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश

अहमदाबाद येथून लंडनला निघालेले एअर इंडिया कंपनीचे AI711 विमान कोसळले आहे. ही घटना गुरुवारी (12 जून) दुपारी मेघानीनगर येथील नागरी भागात कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, हे आंतरराष्ट्रीय विमान 133 प्रवाशांना घेऊन निघाले होते. उड्डाणादरम्यानच ही घटना घडली. विमान कोसळताच आगीचे लोट हवेत उसळताना पाहायला मिळाले.

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद येथे Air India कंपनीचे विमान कोसळले; विमानातील प्रवाशांमध्ये राजकीय व्यक्तिमत्त्वांचा समावेश
Ahmedabad Plane Crash | (Photo Credit- ANI)

अहमदाबाद (Ahmedabad ) येथून लंडनला ( London Flight Emergency) निघालेले एअर इंडिया कंपनीचे AI171 विमान कोसळले (Air India Flight Crash) आहे. हे विमान सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ (Sardar Vallabhbhai Patel International Airport) टेक-ऑफ दरम्यान गुरुवारी (12 जून) दुपारी मेघानीनगर येथील नागरी भागात कोसळले आहे. प्राप्त माहितीनुसार, हे विमान 242 प्रवाशांना घेऊन निघाले होते आणि त्यामध्ये असलेल्या प्रवाशंमध्ये गुजरातच्या एका माजी मुख्यमंत्र्यांचा समावेश आहे. विमान कोसळताच आगीचे लोट हवेत उसळताना पाहायला मिळाले. घटनास्थळावरून मिळालेल्या दृश्यांमध्ये जमिनीवरून राखाडी धुराचे लोट उठताना दिसत आहेत. अधिकाऱ्यांनी अद्याप विमानाच्या प्रकाराबद्दल माहिती दिलेली नाही. ही घटना दुपारी 1 ते 2 च्या दरम्यान घडली.

मृतांचा निश्चित आकडा नाही

एअर इंडियाचे विमान कोसळताच मदत आणि बचावकार्यास सुरुवात झाली आहे. विमानामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रवासी होते. तसेच हे कोसळलेले विमान पूर्ण इंधनक्षमतेने भरलेले असल्याने आगीची तीव्रताही अधिक असण्याची शक्यता आहे. त्यामुळे अपघातात झालेले नुकसान आणि मृतांची संख्या याबाबत अद्यापही निश्चित आकडा पुढे आला नाही. (हेही वाचा, Plane Crash in Southern Mexico: दक्षिण मेक्सिकोमध्ये विमान अपघात; 3 जणांचा मृत्यू)

अग्निशमन दलाच्या पाचपेक्षा अधिक गाड्या घटनास्थळी

अहमदाबाद अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुष्टी केली की, पाचपेक्षा जास्त अग्निशमन गाड्या घटनास्थळी तात्काळ तैनात करण्यात आल्या आहेत. 'विविध शहर विभागातील अनेक अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचले आहेत. खबरदारी म्हणून अग्निशमन नियंत्रण आणि सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत,' असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

एअर इंडियाकडून घटनेची पुष्टी

आगीच्या कारणांबाबत प्रतिक्षा

प्रसारमाध्यमांनी वार्तांकनामध्ये म्हटले आहे की, विमानात 242 प्रवासी होते आणि काही जखमी झाल्याची भीती आहे, जरी मृतांची अधिकृत माहिती अद्याप प्रतीक्षेत आहे. या घटनेचे नेमके कारण आणि विमानाचे किती नुकसान झाले आहे हे सध्या अज्ञात आहे. विमानतळ अधिकाऱ्यांनी संपूर्ण अंतर्गत चौकशी सुरू केली आहे, तर तांत्रिक मूल्यांकन पथक सध्या विमानाची तपासणी करत आहे.

एअर इंडिया आणि नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) दोघेही अधिक माहिती उपलब्ध होताच पुढील अपडेट्स जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. या घटनेमुळे विमानतळ सुरक्षा प्रोटोकॉल आणि विमानाच्या तयारीबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे, विशेषतः आंतरराष्ट्रीय उड्डाण ऑपरेशन्स दरम्यान. तपास सुरू असल्याने विमानतळावरील उड्डाण ऑपरेशन्सवर तात्पुरते परिणाम झाला आहे. दरम्यान, हे विमान नागरि परिसरात कोसळल्याने मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी जमली आहे. या गर्दीला पांगविण्याचेही काम प्रशासनाला करावे लागत आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jan 01, 1970 05:30 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).