James Anderson (Photo Credit: Twitter)

क्रिकेट विश्वात सतत नवनवीन विक्रम पाहायला मिळत असतात. यातच इंग्लंडचा जलदगती गोलंदाज जेम्स अँडरसनने (James Anderson) विक्रमाला गवसणी घातली आहे. पाकिस्तानविरुद्ध तिसऱ्या कसोटी सामन्याच्या अखेरच्या दिवशी त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 600 बळींचा टप्पा गाठला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये 600 विकेट्स घेणारा अँडरसन हा जगातील चौथा आणि जलदगती गोलंदाजापैकी पहिला ठरला आहे. याआधी याआधी मुथय्या मुरलीथरन, शेन वॉर्न आणि अनिल कुंबळे यांनी 600 बळींचा टप्पा गाठला होता. अँडरसनने केलेल्या कामगिरीमुळे संपूर्ण क्रिकेटविश्वातून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. याशिवाय मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर, भारताचा कर्णधार विराट कोहली, भारताचा माजी गोलंदाज अनिल कुंबले, यांच्यासह बऱ्याच खेळाडूंनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

कसोटीच्या अखेरच्या दिवसातली पहिली दोन सत्र पावसाच्या व्यत्ययामुळे वाया गेली होती. त्यामुळे अँडरसनला आपला विक्रम करण्यासाठी आणखी वाट पहावी लागणार की काय? असे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु, अखेरच्या सत्रात पावसाने उसंत घेतल्यानंतर खेळ सुरू झाला होता. अँडरसनने एका उसळत्या चेंडूवर पाकिस्तानचा कर्णधार अझर अलीला झेलबाद केले. चेंडू नीट न समजल्याने अझर अलीने फटका खेळलाच नाही. पण चेंडू मात्र त्याच्या बॅटला लागला आणि जो रूटने स्लिपमध्ये त्याचा झेल टिपला. त्यानंतर क्रिकेटविश्वातून अँडरसनच्या दमदार कामगिरीला सलाम करण्यात आला आहे. हे देखील वाचा- Most Runs in IPL Death Overs: 'मसल्स पॉवर'! एमएस धोनीने डेथ ओव्हरमध्ये चोपल्या आहेत सर्वाधिक धावा, तर रिषभ पंतचा स्ट्राइक रेट सर्वात बेस्ट

सचिन तेंडूलकर यांचे ट्विट-

विराट कोहलीचे ट्विट-

अनिल कुंबले यांचे ट्वीट-

शेन वार्न यांचे ट्विट-

युवराज सिंह यांचे ट्विट-

सर्वाधिक बळी घेण्याच्या यादीत मुथय्या मुरलीथरन अव्वल स्थानी आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाचा खेळाडू शेन वार्न दुसऱ्या तर, भारताचा गोलंदाज अनिल कुंबले तिसऱ्या स्थानावर आहे. मुथय्या मुरलीथरनने आपल्या कारकिर्दीत 133 कसोटी समान्यात 22.7 च्या सरासरीने 800 बळी घेतले आहेत. त्यानंतर शेन वार्नने 145 कसोटी सामन्यात 25. 4 च्या सरासरीने 708 तर, अनिल कुंबले यांनी 132 सामन्यात 2.69 च्या सरासरीने 619 बळी घेतले आहे. अनिल कुंबलेचा विक्रम मोडण्यासाठी अँडरसनला केवळ 19 बळी घ्यावी लागणार आहे.