Most Runs in IPL Death Overs: 'मसल्स पॉवर'! एमएस धोनीने डेथ ओव्हरमध्ये चोपल्या आहेत सर्वाधिक धावा, तर रिषभ पंतचा स्ट्राइक रेट सर्वात बेस्ट
एमएस धोनी, रिषभ पंत (Photo Credit: Facebook)

इंडियन प्रीमिअर लीगला (Indian Premier League) 19 सप्टेंबर पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना गेतजेता व चार वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि तीन वेळा टूर्नामेंट विजेते चेन्नई सुपर किंग्समध्ये (Chennai Super Kings) खेळला जाईल. रोहित शर्मा (Rohit Sharma) मुंबईचे तर एमएस धोनी (MS Dhoni) चेन्नईचे नेतृत्व करताना दिसेल. आंतराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेल्या धोनीचा वर्ल्ड कप 2019 सेमीफायनलनंतरचा हा पहिलाच सामना असेल. वर्ल्ड कपच्या सेमीफायनल सामन्यात पराभवानंतर धोनीने एकही स्पर्धात्मक सामना खेळला नाही. धोनी घरगुती आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 'फिनिशर' म्हणून ओळख जातो. आणि त्यामागे कारणही तशीच आहेत. धोनीने आजवर आयपीएलमध्ये डेथ ओव्हरमध्ये सर्वाधिक 2206 धावा केल्या आहेत. अंतिम चार षटकांत त्याचा स्ट्राइक रेट 190.50 आहे. या यादीत पुढील फलंदाजापेक्षा त्याने सुमारे 1000 धावा जास्त केल्या आहेत. मुंबईचा अष्टपैली किरोन पोलार्डने 178.71 च्या स्ट्राईक रेटने 1276 धावा फटकावल्या आहेत. (रविचंद्रन अश्विनला दिल्ली कॅपिटल्सकडून नाही करता येणार 'मंकड रनआऊट', 13 व्या सीजनपूर्वी रिकी पॉन्टिंगने दिली चेतावणी)

रोहित (199.64 च्या स्ट्राईक रेटने 1136) आणि एबी डीव्हिलियर्स (234.55च्या स्ट्राईक रेटने 1063) हे आयपीएलच्या इतिहासामध्ये डेथ ओव्हर्समध्ये 1000 हुन अधिक धावा करणारे फलंदाज आहेत. मात्र, या सर्वांमध्ये भारताचा युवा विकेटकीपर-फलंदाज रिषभ पंतचा (Rishabh Pant) स्ट्राइक रेट डेथ ओव्हरमध्ये सर्वात बेस्ट आहेत. पंतने 236.17 च्या स्ट्राइक रेटने डेथ ओव्हर 333 धावा केल्या आहेत, तर डिव्हिलिअर्सची स्ट्राइक रेट दुसरा सर्वाधिक आहे. या यादीत 218.54 स्ट्राइक रेटसह 660 धावांनी विंडीजचा धडाकेबाज आंद्रे रसेल तिसऱ्या, 215.75 स्ट्राइक रेटने 328 धावांसह क्रिस गेल चौथ्या आणि 206.04 स्ट्राइक रेटने संजू सॅमसनने पाचव्या सर्वाधिक 307 धावा केल्या आहेत.

गोलंदाजांमध्ये, मुंबई इंडियन्सचा यॉर्कर स्पेशलिस्ट लसिथ मलिंगाने आयपीएलमधील डेथ ओव्हर्समध्ये 90 विकेट्स घेतल्या आहेत. ड्वेन ब्राव्हो 77 आणि भुवनेश्वर कुमार 66, या गोलंदाजांनी डेथ ओव्हर्समध्ये 50 हुन अधिक विकेट्स आहेत. या यादीत सुनील नारायण 48 विकेट्ससह चौथ्या क्रमांकावर आहे. डेथ ओव्हर्समध्ये अन्य कोणत्याही फिरकी गोलंदाजाने 26 पेक्षा जास्त गडी (पियुष चावला) बाद केले नाहीत.