ENG vs WI: Biosecurity नियम मोडल्या प्रकरणी जोफ्रा आर्चरला दंड, पण वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यासाठी उपलब्ध
जोफ्रा आर्चर (Photo Credits: Getty Images)

21 जुलै रोजी जोफ्रा आर्चरला (Jofra Archer) पुन्हा इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात (England Cricket Team) प्रवेश घेण्यास परवानगी देण्यात आली असून इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) त्याला दंडही ठोठावला आहे व लिखित चेतावणीही दिली आहे. ईसीबीने दंडाची रक्कम जाहीर केली नाही. आर्चरने वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) सुरू असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिका सुरक्षीत व सुरळीत पार पाडण्यासाठी लावलेल्या बायो-सुरक्षित मार्गदर्शक तत्त्वांचा भंग केला ज्यामुळे त्याला मॅन्चेस्टर (Manchester) येथील दुसऱ्या कसोटी सामन्याला मुकावे लागले. पहिल्या कसोटीतील प्लेइंग इलेव्हनमधील तीन वेगवान गोलंदाजांपैकी आर्चर मॅन्चेस्टरला जात असताना त्याच्या घरी गेला. ईसीबीने आपल्या खेळाडूंना त्यांच्या स्वत:च्या गाड्यांद्वारे दुसऱ्या कसोटीच्या ठिकाणी पोहोचण्याची परवानगी दिली होती. The Sun मधील एका वृत्तानुसार त्याने कुत्र्याला पाहण्यासाठी त्याच्या निवासस्थानाला भेट दिली असल्याचे समजले जात आहे. परिणामी, दुसरा कसोटी सामना सुरू होण्याच्या काही तास आधी ईसीबीने त्याला संघातून वगळले. (ENG vs WI 2nd Test: बेन स्टोक्स याने टेस्ट सामन्यात टी-20 स्टाईलमध्ये असा मारला षटकार; खेळला 176 धावांचा विक्रमी डाव, Watch Video)

कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आयसीसीने खेळाडूंना सोशल डिस्टन्सिंग ते  स्वच्छतेबद्दलचे सर्व नियम आखून दिले होते, पण आर्चरच्या निष्काळजी पणामुळे संपूर्ण मालिकेचं भवितव्य धोक्यात घातल्याची प्रतिक्रीया इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी दिली होती. दरम्यान, 24 जुलै रोजी सुरु होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्ध तिसऱ्या कसोटीसाठी आर्चर उपलब्ध असेल. शिवाय, सेल्फायसोलेश कालावधी उठवण्यापूर्वी आर्चरची दोन कोविड-19 चाचणी केली जाईल जी नकारात्मक येणे गरजेचे आहे.

दुसरीकडे, मॅन्चेस्टरमधील दुसऱ्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडने 9 विकेट गमावून469 धावांवर आपला पहिला डाव घोषित केला. प्रत्युत्तरात विंडीज 32 धावांवर 1 विकेट गमावली आणि इंग्लंडला 437 धावांची आघाडी मिळाली आहे. पण, इंग्लंडसाठी निराशाजनक म्हणजे तिसरा दिवस पावसामुळे वाया गेला. तिसऱ्या दिवशी एकही चेंडू फेकला गेला नाही. यजमान टीमकडून बेन स्टोक्सने 176 आणि डोम सिब्लीने 120 धावांचा शतकी डाव खेळत टीमला मजबूत स्थितीत नेले. यापूर्वी, साऊथॅम्प्टन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात इंग्लंडला 4 धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले होते.