बेन स्टोक्स (Photo Credit: Getty Images)

पहिल्या कसोटीत पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर यजमान इंग्लंडने (England) वेस्ट इंडिजविरुद्ध (West Indies) दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरूवात केली. नाणेफेक जिंकत वेस्ट इंडिजने प्रथम गोलंदाजीची निवड केली. त्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर इंग्लंडने 9 विकेट गमावून 469 धावांवर पहिला डाव घोषित केला. सलामी फलंदाज डोम सिब्ली (Dom Sibley) आणि बेन स्टोक्स (Ben Stokes) यांनी चौथ्या विकेटसाठी 233 धावांची भागीदारी केली. या सामन्यात स्टोक्स वेगळ्या स्टाईलमध्ये दिसला. कसोटीही त्याने टी-20 शैलीत फलंदाजी केली आणि सुलभ चेंडूंवर गोलंदाजीवर वर्चस्व गाजवली. रोस्टन चेसच्या चेंडूवर त्याने थेट पुढे जाऊन शानदार षटकार ठोकला. इंग्लंड क्रिकेटने (England Cricket) याचा व्हिडिओ शेअर केला जो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. रोस्टन 45 वी ओव्हर टाकण्यासाठी आला. त्यावेळी वेस्ट इंडिजला सामन्यात परतण्यासाठी विकेटची आवश्यकता होती. पण त्यावेळी स्टोक्सची शैली वेगळी होती. (ENG vs WI 2nd Test: सचिन तेंडुलकर याच्याकडून मँचेस्टर टेस्ट सामन्यात जेसन होल्डरच्या निर्णयाचे कौतुक, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर)

चेसने जेव्हा बॉल फेकला तेव्हा त्याने पुढे जाऊन जोरदार षटकार ठोकला. पहिल्या कसोटी सामन्यात एकही षटकार लगावण्यात आला नव्हता, त्यामुळे स्टोक्सने ठोकलेला हा षटकार मालिकेतील पहिला होता. दुसरीकडे, स्टोक्सने इंग्लंडकडून पहिल्या डावात 176 धावांचा शानदार डाव खेळला आणि रेकॉर्ड बुकमध्ये आपले नाव सामील केले. कसोटी क्रिकेटमध्ये 4,000 धावा, 10 शतकं आणि 150 विकेट घेणारा स्टोक्स आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील फक्त चौथा क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी गॅरी सोबर्स, इयान बोथम, जॅक कॅलिस यांनी हा पराक्रम केला होता.

पाहा स्टोक्सचा टेस्ट सामन्यात टी-20 स्टाईल षटकार

दरम्यान, पहिली कसोटी सामना गमावलेल्या यजमान इंग्लंडने पहिल्या दिवशी 81 धावांवर तीन विकेट गमावल्यावर कॅरेबियन गोलंदाजांवर दबाव आणला. सिबलीने 120 आणि स्टोक्सने 176 धावांचा महत्वपूर्ण डाव खेळला आणि यजमान टीमला दुसऱ्या दिवसाखेर ड्राइवर सीट मिळवून दिली. कोरोना प्रोटोकॉल तोडल्यामुळे इंग्लंडचा संघ वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरविना दुसरा कसोटी सामना खेळत आहे.