ENG vs WI 2nd Test: सचिन तेंडुलकर याच्याकडून मँचेस्टर टेस्ट सामन्यात जेसन होल्डरच्या निर्णयाचे कौतुक, पाहा काय म्हणाला मास्टर-ब्लास्टर
रोस्टन चेस आणि जेसन होल्डर (Photo Credit: Getty)

मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे पहिल्याच दिवशी फिरकीपटूला खेळपट्टीवर आणण्यासाठी वेस्ट इंडीजचा कर्णधार जेसन होल्डरचे (Jason Holder) भारताचे महान सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) कौतुक केले. इंग्लंड (England)-वेस्ट इंडिजमध्ये (West Indies) मँचेस्टरच्या ओल्ड ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्याची सुरुवात पावसामुळे लांबली गेली. नाणेफेक जिंकून वेस्ट इंडीजने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. इंग्लंडने सुरुवातीच्या दोन विकेट गमावल्यामुळे हा निर्णय विंडीजच्या बाजूने असल्याचे दिसत आहे. विंडीजचा फिरकी गोलंदाज रोस्टन चेस (Roston Chase) याने रोरी बर्न्स आणि झॅक क्रॉली यांना बाद करून इंग्लंडला सुरुवातीला दोन झटके दिले. मॅचची परिस्थिती पाहून भारतीय क्रिकेट दिग्गज सचिनने ओलसर खेळपट्टीवर फिरकीपटू आणण्याच्या होल्डरच्या निर्णयाचे कौतुक केले आणि सोबतच खेळपट्टीचा स्थितीही सांगितली. (ENG vs WI 2nd Test: इंग्लंडचा गोलंदाज जोफ्रा आर्चरने तोडला कोरोना प्रोटोकॉल, टीमने मॅन्चेस्टर येथील दुसर्‍या टेस्ट सामन्यातून केले बाहेर)

इंग्लंड विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेवर क्रिकेटच्या इतर चाहत्यांप्रमाणे नजर ठेवणाऱ्या तेंडुलकरने ट्विटरवर लिहिले, “पहिल्या सत्रात मला लक्षात आले की वेगवान गोलंदाजांकडून ओलसर खेळपट्टीवर काही बॉल विकेटकीपरकडे गेले नाही. ऑडबॉल पकडेल आणि इतर सरळ जाऊ शकतात अशा ट्रॅकवर फिरकीपटूला आणण्यासाठी जेसन होल्डरने स्मार्ट पाऊल उचलले." माजी कर्णधार जेसन होल्डरला सध्या जगातील सर्वात अंडररेटेड अष्टपैलू खेळाडू म्हणून स्थान देणार्या सचिनने पहिल्यांदा विंडीज कर्णधाराचे कौतुक केले आहे.

दुसऱ्या कसोटी सामन्यात जोफ्रा आर्चर आणि जो डेन्ली यांना इंग्लंड संघातून बाहेर काढले आहे. आर्चरने टीमच्या बायो-सुरक्षित प्रोटोकॉलचा भंग केल्याने त्याला सामन्यातून बाहेर करण्यात आले, तरडेन्लीच्या जागी कर्णधार जो रुतला प्लेयिंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. मार्क वुड आणि जेम्स अँडरसन यांनाही विश्रांती देण्यात आली असून स्टुअर्ट ब्रॉड, सॅम कुर्रान आणि क्रिस वोक्स यांना प्लेयिंग इलेव्हनमध्ये जागा मिळाली.