ENG vs PAK T20I Squad: तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत पाकिस्तान (Pakistan) संघाचा 3-0 असा व्हाईटवॉश केल्यानंतर आता इंग्लंड (England) संघाचे लक्ष टी-20 मालिकेकडे आहे. यासाठी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने 16 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे. पाकिस्तानविरुद्ध टी-20 मालिकेत कर्णधारपदाची जबाबदारी घेण्यासाठी नियमित कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) संघात परतला आहे. श्रीलंकाविरुद्ध मालिकेनंतर आवश्यक क्वारंटाईन कालावधी पूर्ण करून संघात परतणाऱ्या नऊ खेळाडूंपैकी मॉर्गन एक आहे. इंग्लंडच्या वनडे संघातील 7 सदस्य, तीन खेळाडू व चार कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होईल. त्यामुळे 8 जुलैपासून पाकिस्तान संघाविरुद्ध सुरू होणाऱ्या 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी इंग्लंडचा संपूर्ण संघ बदलण्यात आला होता. (Babar Azam World Record: बाबर आजम याचा हाशिम आमला, विराट कोहली यांना धक्का, एका शतकी खेळीने केले 5 कमाल)
मात्र आता पाकिस्तानविरुद्ध आगामी मालिकेत सहभागी होण्यासाठी 16 सदस्यीय संघ व सहाय्यक कर्मचाऱ्यांची कोविड-19 चाचणी नकारात्मक आली आहे. ख्रिस सिल्व्हरवूड विश्रांती घेणार असल्यामुळे पॉल कॉलिंगवूड मुख्य प्रशिक्षक म्हणून संघाची देखरेख करतील. सिल्वरवूड यांनी श्रीलंका मालिकेदरम्यान विश्रांती घेतली होती. शुक्रवारी 16 जुलै रोजी ट्रेंट ब्रिजवर तीन सामन्यांची मालिका सुरु होईल. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध मालिकेसाठी श्रीलंके विरोधात खेळलेला संघ मैदानात उतरणार होता. दुसरीकडे, वनडे मालिकेबद्दल बोलायचे तर मंगळवारी झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात पाकिस्तानला व्हाईटवॉश देत बेन स्टोक्सच्या ब्रिटिश संघाने मालिका 3-0 ने आपल्या खिशात घातली. या सामन्यात पाकिस्तान संघाने इंग्लंडला 332 धावांचे लक्ष्य दिले होते. इंग्लंड संघाने हे लक्ष्य 48 षटकांमध्ये 7 विकेट गमावत पूर्ण केले. जेम्स व्हिन्सने सर्वाधिक 102 धावा केल्या. विन्सच्या एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले शतक होते. पाकिस्तानकडून कर्णधार बाबर आजमने देखील सर्वाधिक 158 धावांचा डाव खेळला परंतु संघाला विजय मिळवून क्लीन स्वीप टाळण्यासाठी तो पुरेसा ठरला नाही.
Morgs returns for the Vitality IT20 series against Pakistan!
🏴 #ENGvPAK 🇵🇰
— England Cricket (@englandcricket) July 14, 2021
इंग्लंडचा टी-20 संघ: इयन मॉर्गन (कॅप्टन), जोस बटलर, जॉनी बेयरस्टो, मोईन अली, जेक बॉल, टॉम बंटन, लुईस ग्रेगरी, क्रिस जॉर्डन, लियम लिव्हिंगस्टोन, साकीब महमूद, डेविड मलान, मॅट पार्किन्सन, आदिल राशिद, जेसन रॉय आणि डेविड विले.