Babar Azam World Record: बाबर आजम याचा हाशिम आमला, विराट कोहली यांना धक्का, एका शतकी खेळीने केले 5 कमाल
बाबर आजम (Photo Credit: Twitter/ESPNcricinfo)

ENG vs PAK 3rd ODI 2021: इंग्लंडविरुद्ध (England) तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात पाकिस्तानी (Pakistan) कर्णधार बाबर आजमने (Babar Azam) एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वाधिक धावांची नोंद करत संघाला 331 धावांपर्यंत मजल मारून दिली. इंग्लंडच्या दुसऱ्या स्ट्रिंग संघाविरुद्ध पहिल्या दोन सामन्यात पाकिस्तानच्या निराशाजनक कामगिरीनंतर बाबरने 139 चेंडूत 158 धावा ठोकल्या. एजबॅस्टन येथे इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसर्‍या वनडे सामन्यात बाबर आजमने रेकॉर्ड-ब्रेक शतक ठरले. त्याच्या एका शतकी खेळीने अनेक रेकॉर्डस् मोडले तर अनेक विक्रम नोंदवले. आपल्या या खेळीच्या जोरावर बाबरने 5 कमाल केले. यामध्ये सर्वात महत्वाचा म्हणजे तो 14 वे वनडे शतक करणारा सर्वात वेगवान फलंदाज ठरला. (Matt Parkinson याच्या चेंडूची क्रिडाविश्वात चर्चा, कसा झालो आऊट? Imam-ul-Haq यालाही पडला प्रश्न; पाहा व्हिडिओ)

बाबरने अवघ्या 81 डावात 14 वे एकदिवसीय शतक ठोकले आणि 26 वर्षीय फलंदाजाने यादीत Hashim Amla (84 डाव), डेव्हिड वॉर्नर (98 डाव), विराट कोहली (103 डावा) आणि क्विंटन डी कॉक (104 डावा) यांना पछाडले. इंग्लंडमध्ये ब्रिटिश संघाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात तीन आकडी धावा नोंदवणारा बाबर हा पहिला पाकिस्तानी कर्णधारही ठरला आहे. यापूर्वी इमरान खानने 1983 विश्वचषकात श्रीलंकेविरुद्ध इंग्लंडमध्ये शतक ठोकले होते. तसेच बाबर कपिल देव आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्यानंतर SENA देशांमध्ये 150+ धावा करणारा तिसरा आशियाई फलंदाज ठरला आहे. पुरुष एकदिवसीय सामन्यात बाबरने केलेल्या 158 धावा पाकिस्तानी कर्णधाराने केलेल्या सर्वाधिक धावा आहेत. पाकिस्तानी कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा केल्याचा शोएब मलिकाचा विक्रम बाबर आजमने मोडला. मलिकने भारताविरुद्ध 2008 मध्ये नाबाद 125 धावा केल्या होत्या.

दरम्यान, इंग्लंडच्या एजबॅस्टन मैदानावर बाबर आजमचे राज्य आहे. या मैदानावर त्याने गेल्या तीन डावात अनुक्रमे 158, नाबाद 101 आणि नाबाद 31 धावा केल्या आहेत. इथे त्याने 290 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. भारताचा कर्णधार विराट कोहली दुसर्‍या क्रमांकावर असून त्याने एजबॅस्टन येथे 111.66 च्या सरासरीने धावा केल्या आहेत. केन विल्यमसन 103.33 च्या सरासरीने तिसर्‍या आणि रोहित शर्मा 89.40 च्या सरासरीसह चौथ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे, पहिले फलंदाजी करून पाकिस्तानने 331/9 धावांपर्यंत मजल मारली पण इंग्लंडने जेम्स व्हिन्सच्या पहिले वनडे शतक आणि लुईस ग्रेगरीच्या 77 धावांच्या जोरावर 7 विकेट्स गमावून मनोरंजक विजय मिळवला आणि मालिकेत पाक संघाचा 3-0 असा सफाया केला.