मॅनचेस्टर येथे इंग्लंड (England) -पाकिस्तानमधील (Pakistan) पहिल्या टेस्टच्या पहिल्या दिवशी फक्त 49 ओव्हर्सचा खेळ शक्य झाला परंतु बाबर आझम (Babar Azam) भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli), ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, केन विल्यमसन आणि जो रूटच्या लीगमध्ये आहे याची इंग्लंडचा माजी कर्णधार नासेर हुसेन (Nasser Hussain) यांनाखात्री पटली. ओल्ड ट्रॅफर्ड (Old Trafford) येथे पाकिस्तानने पहिल्या दिवशी 139 धावांवर 2 विकेट गमावल्या होत्या आणि बाबरने पहिल्या दिवशी अर्धशतकी खेळी केली व 69 धावांवर नाबाद राहिला. मागील पाच सामन्यांमध्ये तीन शतके झळकवणार्या बाबरचे तितक्याच कसोटी मालिकेतील सलग पाचवे अर्धशतक होते. जेम्स अँडरसन, स्टुअर्ट ब्रॉड, जोफ्रा आर्चर आणि क्रिस वोक्ससारख्यांच्या चेंडूंवर बाबरला दमछाक करणारे ड्रायव्ह खेळताना पाहत हुसैन म्हणाले की बाबर कर्णधार विराट कोहली नसल्यामुळे लोकं त्याविषयी फारसं बोलत नाहीत. (ENG vs IRE 3rd ODI: आयर्लंडने तिसर्या वनडे सामन्यात इंग्लंडविरुद्ध 7 विकेटने मिळवला शानदार विजय, मोडला टीम इंडियाचा 18 वर्ष जुना रेकॉर्ड)
“जर हा विराट कोहली असता तर प्रत्येकजण त्याच्याबद्दल बोलले असते पण बाबर आझम असल्याने कोणीही याबद्दल बोलत नाही,” इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर यांनी स्काय स्पोर्ट्ससाठी भाष्य करताना म्हटले. “तो युवा आहे, तो हुशार आहे आणि त्याच्यात या सर्व गोष्टी आहेत,” नासिरने पुढे म्हटले. हुसेन यांनी सांगितले की, बाबरने जगातील अव्वल पाच फलंदाजांमध्ये स्थान मिळाले आणि ते आता फॅब फोर नाही‘फॅब फाइव्ह’ बनले आहे. “ते ‘फॅब फोर’ (कोहली, ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ, न्यूझीलंडचा केन विल्यमसन आणि इंग्लंडचा कर्णधार रूट) याबद्दल बोलत राहतात - ते ‘फॅब फाइव्ह’ आहेत आणि त्यात आझम सामील झाला आहे.”
💬They keep going on about the fab four, it's the fab five and Babar Azam is in that.💬@nassercricket says Babar Azam should be considered alongside the likes of Virat Kohli and Steve Smith as one of the best batsmen on the planet...
— Sky Sports Cricket (@SkyCricket) August 5, 2020
पाकिस्तानी कर्णधार अझर अलीने टॉस जिंकला आणि पहिले फलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानची धावसंख्या 43-2 असताना बाबर फलंदाजीसाठी आला. बाबरने सावधगिरीने सुरुवात केली परंतु दुपारच्या जेवणानंतर त्याने स्टाईलिश शॉट्सची झुंबड फोडली आणि 70 चेंडूत नऊ चौकार ठोकत अर्धशतक झळकावले. इंग्लंडचे गोलंदाज ब्रॉड, आर्चर आणि अँडरसनविरुद्ध बाबरने शानदार शॉट्स खेळत प्रभावित केले. 2018 पासून बाबर आझम पाकिस्तानसाठी महत्वाची भूमिका निभावत आहेत, मग तो कोणताही फॉरमॅट असो. बुधवारी झालेल्या पाऊस आणि खराब प्रकाशामुळे खेळ लवकर संपुष्टात आला तोवर पाकिस्तानने 49 ओव्हरमध्ये 2 बाद 139 धावा केल्या. सलामी फलंदाज शान मसूद बाबरसोबत 152 चेंडूत सात चौकारांच्या मदतीने 46 धावा करून क्रीजवर आहे.