Don't Have Guts! हर्षा भोगले यांनी निजामुद्दीन मरकज इव्हेंटचे ट्विट केले डिलीट, स्पष्टीकरण जारी करताच नेटिझन्सने केले ट्रोल
हर्षा भोगले (Photo Credits: Getty Images)

प्रसिद्ध क्रिकेट भाष्यकार हर्षा भोगले (Harsha Bhogle) यांना एक ट्विट डिलीट केल्यावर सोशल मीडियावर स्पष्टीकरण जाहीर करावे लागले. भोगले यांनी ट्विटरवर भाष्य केले आणि लिहिले की, “पुढच्या काही आठवड्यांत आपण आपला मोठा समुदाय आणि त्याच्या कल्याणासाठी एकाच गोष्टीचे पालन केले पाहिजे. जर आपण हा व्हायरस अधिक वाढण्यापासून रोखला तर तो आपल्याला अधिक सामर्थ्यवान बनवेल. आम्हाला अधिक निजामुद्दीन परवडत नाहीत.” नंतर भोगले यांनी हे ट्विट हटवले आणि दिल्लीतील निजामुद्दीन मरकझ (Nizamuddin Markaz) इव्हेंटचा संदर्भ न घेता पुन्हा पोस्ट केले. कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) उद्रेकाचा परिणाम इतर देशांप्रमाणेच भारतावरही झाला आहे. 24 मार्चपासून देशामध्ये विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाउनमध्ये आहे. पण, आजाराने ग्रस्त लोकांची संख्या प्रत्येक वाढत्या दिवसाबरोबर वाढत आहे. आणि कोरोना व्हायरसचा नवीन केंद्र बनले आहे हे म्हणजे तबलीगी जमातची (Tablighi Jamaat) सहा मजली इमारत - ज्याला मार्कझ म्हणतात. (Coronavirus: दिल्लीतील ‘त्या’ धार्मिक कार्यक्रमात देश-विदेशातील 1500 हून अधिक लोक सामील; 24 जणांना कोरोनाची लागण, देशात भीतीचे वातावरण)

सुमारे 3,400 लोक 13 मार्च रोजी निझमुद्दीन मरकझ येथे धार्मिक मेळाव्यासाठी एकत्र आले होते. याच्याशी संबंधित भोगले यांनी ट्विट केले पण प्रतिक्रियांच्या भीतीमुळे त्यांनी ते ट्विट डिलीट केले आणि निजामुद्दीन शब्द वगळता पुन्हा दुसरे ट्विट केले. भोगले यांनी स्पष्टीकरण जारी केले की,“माझे ट्वीट बोट दाखवण्याच्या दिशेने जात होते ज्याने मला विचलित केले. आपल्याला जास्त जनसंमेलन परवडत नाही, या वस्तुस्थितीवर प्रकाश टाकण्याचा माझा हेतू होता,” असे भोगले यांनी ट्विट केले.

भोगले यांचे स्पष्टीकरण

भोगले यांचे सुधारित ट्विट

परंतु नेटिझन्सनी हे ट्विट हटविल्याबद्दल भोगले यांचे कौतुक केले नाही आणि त्यासाठी ज्येष्ठ भाष्यकारांना फटकारले

जे सांगितले ते पूर्ण सत्य आहे

सेक्युलर फिल्टरसह ट्विट करा

तू तर फट्टू निघालास

सत्य बोलण्याची भीती वाटते का?

हे क्रिकेट नाही

हिंमत नाही

दरम्यान तबलीघी जमात हजारोंच्या संख्येने जमलेल्या निजामुद्दीन मार्काझशी संबंधित कोरोना व्हायरस पॉझिटिव्ह प्रकरणं आढळून आल्याची एकूण संख्या 93 वर पोचली आहे. त्यामुळे भारतात कोविड-19 पॉसिटीव्ह रुग्णांच्या संख्येतही वाढ झाली आहे.