कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर, दिल्ली (Delhi) येथील एका बातमीने देशात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या साथीच्या रोगाचा त्रास आणखी शक्यता निर्माण झाली आहे. दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन येथे, तबलीगी जमातीच्या एका कार्यक्रमात सामील झालेल्या देशातील विविध ठिकाणच्या 9 लोकांचा मृत्यू झाला आहे. तब्लीगी जमातीच्या मरकझ (Markaz) येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात 281 परदेशी नागरिकांसह, 19 राज्यांतील 1830 सामील झाले होते. आता तपासणीमध्ये यातील 24 लोकांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे.
या कार्यक्रमात अंदमानमधील 21, आसाममधील 216, बिहारमधील 86, हरियाणाचे 22, हिमाचलचे 15, हैदराबादचे 55, कर्नाटकचे 45, महाराष्ट्रातील 115, मेघालयातील 5 आणि केरळचे 10 जण, मध्य प्रदेशातील 107, ओडिशा 15, पंजाब 9, राजस्थान 19, झारखंड 46, तमिळनाडु 501, उत्तराखंड 34, उत्तर प्रदेश येथील 156 आणि पश्चिम बंगाल येथील 73 लोक सामील होते. यातील 700 हून अधिक लोकांना विलगीकरण कक्षात ठेवले असून, इतरांचा शोध सुरु आहे. (हेही वाचा: देशात लॉकडाऊन असताना 6 कोरोना बाधितांची दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी; सरकारकडून उपस्थितांची चाचणी)
मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी जमातीचे नेतृत्व करणाऱ्या मौलानाविरूद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले. निजामुद्दीन पश्चिममधील एका प्रमुख भागाला पोलिसांनी घेराव घातला आहे व तो भाग बंद करण्यात आला आहे. पोलीस सध्या ड्रोनच्या माद्यमातून नजर ठेऊन आहेत. अधिका-यांनी सांगितले की इंडोनेशिया आणि मलेशियासह अनेक देशांतील 2000 हून अधिक प्रतिनिधींनी 1 ते 15 मार्च दरम्यान तबलीग-ए-जमातमध्ये हजेरी लावली. मात्र, स्थानिक लोक म्हणाले की, या कालावधीनंतरही मोठ्या संख्येने लोक जमातीच्या मरकज येथे थांबले होते.