भारतीय क्रिकेट अष्टपैलू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा क्रिकेट जगातील एक गोल करणारा सर्वोत्कृष्ट फिल्डर्सपैकी एक आहे. जडेजाने कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) या कठीण स्थितीत एक व्हिडिओ मेसेज सोशल मीडियावर शेअर केला. सद्यस्थितीत भारतात 3 मे पर्यंत लॉकडाउन (Lockdown) आहे, परंतु परिस्थिती लक्षात घेऊन लॉकडाउन वाढवण्याची शक्यता दिसत आहे. या दरम्यान जडेजाने लॉकडाउनचा नियम मोडण्याचा प्रयत्न करत असणाऱ्यांसाठी एक व्हिडिओद्वारे मेसेज शेअर केला. घरा बाहेर पडल्यास त्यांना कोविड -19 (COVID-19) ची लागण होण्याची शक्यता जास्त असल्याने लोकांना त्यांच्या घरातच राहण्याचा सल्ला दिला जात आहे. म्हणूनच, अनेक सेलिब्रिटी आणि प्रसिद्ध लोकं नागरिकांना सतत घरामध्येच राहायला सांगत आहे. महत्त्वाचा संदेश देण्यासाठी जाडेजाने आपल्या फिल्डिंग वैशिष्ट्यांचा उपयोग केला. (रोहित शर्मा, हरभजन सिंह यांचे लाईव्ह चॅट, Ye Chinese Logo Ne Kya Kar Diya Yaar! म्हणत चीनवर निशाणा; पाहा Funny Video)
त्याने म्हटले आहे की स्पष्टपणे आपण घराबाहेर पडल्यास कोविड-19 तुम्हालाही कॅच करू शकतो. जडेजाने मुंबई इंडियन्स आणि गुजरात लायन्स यांच्यातील सामन्याचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये इरफान पठाणचा चेंडू जसप्रीत बुमराह पॉईंट रीजनच्या दिशेने खेळतो. जडेजा वेगाने चेंडू पकडतो आणि नॉन स्ट्राईकरच्या दिशेने अचूक थ्रो करतो. व्हिडिओ पोस्ट करताना जडेजाने ट्विटरवर लिहिले, "बिंदाज बाहेर फिरायला जा, मजेत टाइम पास करतोय, तुला घरीच रहायला पाहिजे, मग घडणारच होतं." जडेजाचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही धडा शिका आणि घरातच रहा नाहीतर कोरोना तुम्हालाही रनआऊट करू शकतो. पाहा आणि रनआऊट होण्यापासुन आपला बचाव करा:
Bahar bindaas gumthe ho. Mast meh timepass karthe ho, jab aapko ghar pe rahena chahiye. Phir yeh toh hona he tha 😉 #Staystaysafe #runoutmathona pic.twitter.com/UfggndGMkG
— Ravindrasinh jadeja (@imjadeja) April 28, 2020
भारतात कोरोना व्हायरसने 31,000 हुन अधिकच आकडा गाठला असून 1000 लोकांचा बळी घेतला आहे. जगभरात, जगभरात, तीन लाख अधिक लोकांना या व्हायरसची लागण झाली आहे तर 2,11,000 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या व्हायरसमुळे मिळालेल्या सक्तीच्या ब्रेकमुळे खेळाडू सध्या सोशल मीडियावर अधिक सक्रिय झालेले पाहायला मिळत आहे.