IND vs WI 2nd ODI 2023: प्रशिक्षक राहुल द्रविडने केला मोठा खुलासा, यामुळे रोहित-विराटला देण्यात आली विश्रांती
Rahul Dravid (Photo Credit - Twitter)

भारतीय संघाचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि सुपरस्टार फलंदाज विराट कोहलीला (Virat Kohli) दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातून विश्रांती देण्यात आली आहे. टीम इंडियाचा (Team India) सट्टा उलटला आणि वेस्ट इंडिजने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताचा 6 गडी राखून पराभव केला आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 1-1 अशी खिशात घातली. सामन्यानंतर भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी रोहित-विराटला विश्रांती देण्याबाबत मोठे वक्तव्य केले आहे. (हे देखील वाचा: West Indies vs India, 2nd ODI: दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात विंडिजकडून भारताचा सहज पराभव, मालिकेत 1-1 अशी बरोबरी)

काय म्हणाला राहुल द्रविड?

भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, रोहित शर्मा आणि विराट कोहलीला इतर खेळाडूंना संधी देण्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. अशी जोखीम पत्करावी लागते. आम्हाला त्यांची चाचणी घ्यावी लागेल जेणेकरुन प्रमुख खेळाडू जखमी झाल्यावर ते खेळू शकतील. काही जखमी खेळाडू सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत आहेत. आशिया चषकापूर्वी इतर खेळाडूंना संधी देणे गरजेचे होते. तो म्हणाला की खरे सांगायचे तर इतर खेळाडूंना आजमावण्याची ही शेवटची संधी आहे. आशिया चषक स्पर्धेला फक्त एक महिना बाकी आहे. आमच्याकडे वेळ कमी आहे, आम्हाला आशा आहे की आशिया चषक आणि विश्वचषकापर्यंत काही जखमी खेळाडू तंदुरुस्त होतील पण आम्ही कोणतीही संधी घेऊ शकत नाही.

खेळाडूंना तयारी करावी लागेल

प्रशिक्षक राहुल द्रविड म्हणाला की, दुखापतींमुळे खेळाडूंबाबत अनिश्चितता आहे आणि अशा परिस्थितीत इतर खेळाडूंना आजमावणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीसाठी तयार असतील. यामुळे खेळाडूंबाबत काही निर्णय घेण्याची संधीही मिळते. काही ठराविक फलंदाजीच्या ऑर्डरसाठी आम्हाला खेळाडूंना तयार करावे लागेल.

फलंदाजांनी केल्या कमी धावा 

राहुल द्रविडने दुसऱ्या एकदिवसीय सामन्याबद्दल सांगितले की, खेळपट्टीवर फलंदाजी करणे सोपे नव्हते आणि त्याचा संघ 50-60 धावांनी कमी पडला. तो म्हणाला की आम्ही थोडे निराश झालो आहोत. आम्हाला माहित आहे की विकेटवर फलंदाजी करणे सोपे नव्हते. आम्हाला 230 ते 240 धावा करायच्या होत्या. त्यामुळे चांगली धावसंख्या झाली असती. पण आम्ही विकेट्स गमावत राहिलो. आम्ही चांगली सुरुवात केली आणि डावाची उभारणी करण्याची जबाबदारी कोणीतरी घ्यायला हवी होती.