चेन्नई सुपर किंग्ज (Photo Credit: Getty Images)

कोरोना व्हायरसचा (Coronavirus) प्रादुर्भाव जगभर पसरला आहे. या व्हायरसमुळे अनेक देशांत लॉकडाउन सुरू आहे आणि याचा मोठा परिणाम देशांच्या अर्थव्यवस्थेवरही झाला आहे. आयपीएलमधील (IPL) सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय संघांपैकी एक असलेल्या चेन्नई सुपर किंग्जवरही (Chennai Super Kings) या व्हायरसचा परिणाम झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे सीएसकेची मार्केट व्हॅल्यू (CSK Market Value) कमी झाली आहे. इकॉनॉमिक्स टाईम्सच्या अहवालानुसार शेअर बाजारात चेन्नई सुपर किंग्जचे मूल्य कमी झाले आहे. एका बँकरने सांगितले की सीएसकेचा शेवटचा व्यापार 24 रुपयांवर होता, तर काही महिन्यांपूर्वी तो 30 रुपयांवर होता. हे स्पष्टपणे दर्शविते की संघाचे बाजार मूल्य कमी झाले आहे. आयपीएल 2020 च्या आयोजनावर अनिश्चितता असल्याने सर्व संघांवर परिणाम झाला आहे. सीएसकेचे (CSK) शेअर्समध्ये जवळपास 20 टाक्यांनी घसरण झाली आहे. विषाणूमुळे 29 मार्चपासून इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) ची 13 वे आवृत्ती सुरू होणार होते, मात्र परिस्थिती पाहता बीसीसीआयने आयोजनावर 15 एप्रिलपर्यंत ब्रेक लावला. (आयपीएल 2020 वर अद्याप कोणताही निर्णय नाही, कोविड-19 लॉकडाऊन दरम्यान BCCI चं परिस्थितीवर लक्ष)

मागील वर्षी डफ अँड फेल्प्सने आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्युएशनमध्येमुंबई इंडियन्सचे (MI) 809 कोटींचे, सीएसके दुसर्‍या क्रमांकावर (732 कोटी रुपये) मूल्यांकन केले होते. त्यांच्या शेअर्सची गुंतवणूक प्रत्येकी 24 च्या दराने, अनौपचारिक बाजारात 800 कोटी रुपये आहे. पूर्वी त्यांचे अंदाजे मूल्य 1000 कोटी होते. कोलकाता नाइट रायडर्सची (KKR) ब्रँड व्हॅल्यू 629 कोटी रुपये होती. संपूर्ण आयपीएल (IPL) ब्रँडची किंमत 48,000 कोटींपेक्षा जास्त असून ती जगातील सर्वात श्रीमंत लीग बनली आहे.

दरम्यान, ज्याप्रकारे भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहेत हे पाहता, अलिकडच्या काळात आयपीएलचे आयोजन होणे फार कठीण दिसत आहे. आयपीएलचे आयोजन होत नसल्याने सर्व संघांना खूप त्रास सहन करावा लागला आहे. 20 ते 25 दिवसांच्या कालावधीत गोष्टी सामान्य होतील असे फ्रॅन्चायसींना वाटले होते पण तसे होताना दिसत नाही.