
आजपासून आशिया चषक (Asia Cup 2023) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेतील पहिला सामना आज पाकिस्तान आणि नेपाळ (PAK vs NEP) यांच्यात होत आहे. दोन्ही संघांमधील हा सामना मुलतान येथे होत आहे. आशिया चषक स्पर्धेसाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. यावेळी आशिया कपमध्ये टीम इंडियाचा पहिला सामना पाकिस्तानशी (IND vs PAK) होणार आहे. दोन्ही संघांमधील हा सामना 2 सप्टेंबर रोजी होणार आहे. टीम इंडियाने 7 वेळा आशिया कप जिंकला आहे. टीम इंडियाने शेवटच्या वेळी हे विजेतेपद 2018 मध्ये जिंकले होते आणि त्यावेळी देखील ही स्पर्धा वनडे फॉरमॅटमध्ये आयोजित करण्यात आली होती. रोहित शर्मा (Rohit Sharma) आशिया चषकाच्या वनडे फॉरमॅटमध्ये भारतासाठी सर्वाधिक धावा करणारा दुसरा खेळाडू आहे. यावेळी आशिया चषक एकदिवसीय फॉर्मेटमध्ये खेळवला जाईल. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा सक्रिय गोलंदाज भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजा आहे.
रोहित शर्माच्या निशाण्यावर अनेक मोठे रेकाॅर्डस
या स्पर्धेत स्वतः रोहित शर्माच्या निशाण्यावर अनेक मोठे आणि अनोखे रेकॉर्ड्स होतील. रोहित शर्माने 163 धावा करताच एकदिवसीय सामन्यात 10 हजार धावा पूर्ण करणार आहेत. रोहित शर्माने आशिया कपमध्ये 163 धावा केल्या तर तो एकदिवसीय क्रिकेटमध्ये दहा हजार किंवा त्याहून अधिक धावा करणारा भारताचा सहावा फलंदाज ठरेल. (हे देखील वाचा: Rohit Sharma Record: आशिया कपमध्ये रोहित शर्माचा पाकिस्तानविरुद्ध जबरदस्त रेकॉर्ड, यजमान टीम हैराण; तुम्हीच पहा आकडेवारी)
रोहित शर्माला फक्त 163 धावांची गरज
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या सध्या 9 हजार 837 धावा आहेत. आता रोहित शर्माला 10,000 धावा पूर्ण करण्यासाठी आणखी 163 धावा करायच्या आहेत. आशिया चषकात रोहित शर्माच्या बॅटने धाव घेतली तर टीम इंडियाची ताकद दुप्पट होईल, कारण 'हिटमॅन' जेव्हा जेव्हा क्रीझवर फलंदाजी करतो तेव्हा तो मोठी शतकी खेळी करतो. रोहितने शतकाचे दुहेरी शतकात रूपांतर करताना तीन प्रसंगही घडले.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10,000 धावा पूर्ण करणारे भारतीय फलंदाज
18426 – सचिन तेंडुलकर
12898- विराट कोहली
11,221- सौरव गांगुली
10,768- राहुल द्रविड
10599- एमएस धोनी
रोहित शर्माची एकदिवसीय क्रिकेट कारकीर्द
सध्या टीम इंडियाची कमान रोहित शर्माकडे सोपवण्यात आली आहे. रोहित शर्माने टीम इंडियासाठी 244 एकदिवसीय सामने खेळले आहेत. या कालावधीत रोहित शर्माच्या बॅटमधून 9837 धावा झाल्या आहेत. 'हिटमॅन'ने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 48.7 च्या प्रभावी सरासरीने धावा केल्या आहेत. रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 द्विशतके झळकावली आहेत, हा एक अद्वितीय विश्वविक्रम आहे. रोहित शर्माने आतापर्यंत 30 शतके आणि 48 अर्धशतके केली आहेत. रोहित शर्माच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्येही 8 विकेट आहेत.