British ग्रँड प्रिक्स, विंबलडन 2019 की आयसीसी विश्वचषक काय पाहावे, ब्रिटनच्या चाहत्यांमध्ये गोंधळ, पहा Tweets
ब्रिटिश ग्रँड प्रिक्स, विम्बल्डन, विश्वचषक 2019 (Photo Credit: OLADIMEJI/Twitter)

इंग्लंडमध्ये सध्या आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकचे वेड लागले आहे. इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात कोण विजयी होणार याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचे लक्ष लागून आहे. पण इंग्लंडमध्ये आज फक्त विश्वचषक नाही तर ब्रिटीश ग्रँड प्रिक्स (British Grand Prix) फॉर्म्युला वन रेस (F1 Race) आणि विंबल्डन (Wimbledon) पुरुष ऐकेरी सामना खेळवण्यात आले आहे. त्यामुळे चाहत्यांचा अक्षरशः गोंधळ उडाला आहे. इंग्लडमधील आणि जगातील सर्व क्रीडा चाहते रविवारी चॅनेल दरम्यान चॅनेल बदलत असल्याचं चित्र दिसत आहे. या तिन्ही खेळांच्या चाहत्यांनी ट्विटरवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहे. (ENG vs NZ ICC World Cup 2019 Final: विश्वचषक जेतेपदासाठी न्यूझीलंड कडून इंग्लंडला 242 धावांचे लक्ष)

दरम्यान, गुरुवारी लुईस हॅमिल्टन (Lewis hamilton) याने देखील आयोजकांची टीका केली आहे. "मला संजय नाही की आयोजकांनी त्याच दिवशी इतर सर्व मोठ्या क्रीडा कार्यक्रमांसह कार रेस का आयोजित केली," हॅमिल्टन प्री-रेस इव्हेंटमध्ये म्हणाला.

"मी आशा करतो की भविष्यात ते असं काही करणार नाही. हा असा विशेष शनिवार व रविवार आहे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहणार आहे. चाहते काय पहावे हे माहीत नसल्याने रविवारी फक्त चॅनेल बदलत राहतील."