ENG vs NZ ICC World Cup 2019 Final: विश्वचषक जेतेपदासाठी न्यूझीलंड कडून इंग्लंडला 242 धावांचे लक्ष

इंग्लंड (England) आणि न्यूझीलंड (New Zealand) संघात आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमधील रंगतदार फायनल लढत सुरु आहे. विश्वचषकच्या अंतिम सामन्यात टॉस जिंकत न्यूझीलंडने जेतेपदासाठी यजमान इंग्लंडसंघाला 242 धावांचे लक्ष दिले आहे. न्यूझीलंडचा सलामीवीर हेन्री निकोलस (Henry Nicholls) ने सर्वाधिक 55 धावा केल्या. न्यूझीलंड-इंग्लंडमधील आजची लढत ही ऐतिहासिक आहे. वर्ल्ड क्रिकेटच्या इतिहासात 29 वर्षानंतर क्रिकेटविश्वाला एक नवा विजेता मिळेल. या दोन्ही संघांनी आतापर्यंत विश्वचषक जिंकलेला नाही. (ENG vs NZ World Cup 2019 Final: महेला जयवर्धनेला मागे टाकत केन विलियमसन बनला एका विश्वचषकमध्ये सर्वाधिक धावा करणारा कर्णधार)

इंग्लंडच्या गोलंदाजांनी सुरुवातीपासून किवी फलंदाजांना अडचणीत ठेवले. ख्रिस वोक्स (Chris Woakes) याने किवीच्या मार्टिन गप्टिल (Martin Guptill) याला 19 धावांवर बाद करत टीमला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कर्णधार केन विल्यम्सन (Kane Williamson) आणि निकोलस यांनी अर्धशतकी भागिदारी करत 21 ओव्हरमध्ये शंभरचा आकडा गाठला. त्यानंतर वेगवान गोलंदाज लियाम प्लंकेट यांनी किवीजला दोन मोठे झटके देत मोक्याच्या क्षणी किवी कर्णधारा आणि निकोलसला माघारी धाडले. केन 30 धावा करत बाद झाला, तर त्याच्यानंतर रॉस टेलर देखील 15 धावा करत बाद झाला. न्यूझीलंडच्या अडचणी वाढ करत प्लंकेटने जिमी निशाम याला आपल्या जाळ्यात अडकवले. निशाम 19 धावांवर बाद झाला.

इंग्लंडसाठी प्लंकेटने 10 ओव्हरमध्ये 42 धावा देत ३ विकेट्स घेतले तर मार्क वूड यांनी 10 ओव्हरमध्ये 1 विकेट घेतली. तर वोक्सने 9 ओव्हरमध्ये 3 गडी बाद केले. इंग्लंडने गुणतक्त्यात तिसऱे तर न्यूझीलंडने चौथे स्थान पटकावले होते. अंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी दोन्ही संघांनी अनुक्रमे ऑस्ट्रेलिया आणि भारताला सेमीफायनलमध्ये पराभूत केले.