(Photo Credit: Twitter/cricketaakash)

कोरोना व्हायरस (Coronavirus) सर्व क्रिकेट विश्व ठप्प झाले आहे आणि म्हणूनच लोक स्वतःला व्यस्त ठेवण्यासाठी निरनिराळ्या मार्गांकडे पहात आहेत. भारताचा माजी फलंदाज आकाश चोपडा (Aakash Chopra) ने ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यात एका गोलंदाजाने त्याचे अप्रतिम फुटबॉल कौशल्य दाखवले आहे. आकाशने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ असून तो खूपच जुना असूनही तो जोरदार व्हायरल होत आहे. एक व्हिडिओ क्लिप शेअर करताना आकाशने लिहिले की, "गोलंदाज आहे की क्रिस्टियानो रोनाल्डो?" सध्या कोरोना व्हायरसच्या प्रसारामुळे संपूर्ण विश्वातील कामकाजावर परिणाम झाला आहे. क्रीडा विश्वावरही याचा परिणाम झाला आहे. अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असून काहींच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वजण कोणत्याना कोणत्या पद्धतीने वेळ घालवण्याचा मार्ग शोधत आहे. (कोरोनाचा कहर: स्पॅनिश फुटबॉल क्लब Valencia च्या 35% संघाला COVID-19 ची लागण, मागील महिन्यात केला होता इटलीचा दौरा)

आकाशने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज गोलंदाजी करीत आहे आणि त्याच्या समोर डाव्या हाताचा फलंदाज आहे. फलंदाजाने बचावात्मक शॉट खेळला आणि गोलंदाजाने त्याच्या पायाने चेंडू रोखला आणि तो त्याच्याने फुटबॉल खेळू लागला. या विशिष्ट कौशल्याला कीपी-अप्पीज म्हणतात. यात पाय, खालचे पाय, गुडघे, छाती, खांदे आणि डोक्याचे मदतीने बॉलला जमिनीवर पडू देता जगलिंग करावे लागते. त्याचा व्हिडिओ येथे आहे:

दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे जगातील सर्व खेळांचे कार्यक्रम रद्द किंवा पुढे ढकलले गेले आहेत. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) देखील 15 एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अजूनही कायम आहे त्यामुळे संपूर्ण जगभर सध्या खबरदारी घेतली जात आहे. जगभरात सुमारे 1.9 लाख लोकांना संसर्ग झाला असून 7000 हून अधिक लोक मरण पावले आहेत.