आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) संसर्गाच्या भीतीमुळे मोठ्या क्रीडा स्पर्धा रद्द करण्याच्या घटना घडल्या आहेत, परंतु असे असूनही या विषाणूने क्रीडा विश्वातही आपला प्रभाव पडला आहे. स्पॅनिश फुटबॉल क्लब वालेंसियाने (Valencia) सोमवारी सांगितले की त्यांच्या 35 टक्के खेळाडू आणि कर्मचार्यांची या आजारासाठी सकारात्मक चाचणी करण्यात आली आहे. कोरेना व्हायरसच्या संसर्गाची नोंद करणारा स्पॅनिश फुटबॉल क्लब वालेंसिया पहिला क्लब ठरला. गेल्या महिन्यात झालेल्या मिलान (Milan) दौर्यानंतर संघात विषाणूचा प्रसार झाल्याचे क्लबने म्हटले आहे. स्पेनमधील युवा फुटबॉल प्रशिक्षकाच्या निधनानंतर, आता स्पॅनिश फुटबॉल क्लबच्या 35 टक्के खेळाडू आणि कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरस संसर्गामुळे ग्रस्त असल्याची माहिती समोर आली आहे. चॅम्पियन्स लीगच्या अंतिम 16 सामन्यात वालेंसिया आणि अटलांटा (Atlanta) आमने-सामने आले होते. एक दिवसानंतर, इटालियन अधिकाऱ्यांनी त्यास धोकादायक स्थान घोषित केले. (Coronavirus: 21 वर्षीय स्पॅनिश फुटबॉल प्रशिक्षक फ्रांसिस्को गार्सिया बनला कोरोनाचा शिकार, चाहत्यांसाठी मोठा धक्का)
"सामना संपल्यानंतर क्लबने कडक उपाययोजना केली" तरीही, "या ताज्या निकालांवरून असे दिसून येते की अशा प्रकारच्या सामन्यांमधील प्रदर्शनामुळे जवळपास 35% चाचणी चा सकारात्मक दर झाला आहे," व्हॅलेन्शियाने एका निवेदनात म्हटले आहे. रविवारी, व्हॅलेन्सियाने घोषणा केली की क्लबच्या पाच खेळाडू आणि कर्मचार्यांसह अर्जेटिनाचा बचावपटू एज़ेकिएल गारे यांच्यासहकोविड-19 ची सकारात्मक चाचणी केल्याचे समोर आले.
युरोपमधील विषाणूमुळे प्रभावित झालेला स्पेन दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. स्पेनमध्ये एकूण 9,100 प्रकरणांची पुष्टी झाली असून 309 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसमुळे स्पेनमधील मोठ्या फुटबॉल लीग्स देखील अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहेत. दरम्यान काही तासांपूर्वी मालागाच्या क्लब अॅटलेटिको पोर्टाडा अल्टाच्या (Atletico Cotada Alta) कनिष्ठ संघाचा प्रशिक्षक 21 वर्षीय फ्रान्सिस्को गार्सियाचा (Francisco Garcia) कोरोना विषाणूमुळे मृत्यू झाला आहे.