
Royal Challengers Bengaluru vs Sunrisers Hyderabad, TATA IPL 2025 65th Match आयपीएल 2025 चा हा हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आजचा सामना टॉप 2चे चित्र बदलू शकतो. या हंगामातील 65 वा सामना आज सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (SRH vs RCB) यांच्यात लखनौच्या अटल बिहारी वाजपेयी एकाना स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 वाजता खेळला जाईल. आरसीबीने आधीच प्लेऑफमध्ये आपले स्थान पक्के केले आहे पण जर त्यांना टॉप 2 मध्ये राहायचे असेल तर या सामन्यात विजय आवश्यक आहे. हैदराबादसाठी, ही सन्मानाची लढाई असेल आणि त्यांना आरसीबीचे टॉप 2 समीकरणही बिघडवायचे असेल. जरी एसआरएच आता प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी, त्यांना सन्मानजनक विजयासह स्पर्धेतून बाहेर पडायचे आहे.
हेड टू हेड रेकाॅर्ड (SRH vs RCB Head to Head Record)
आयपीएलच्या इतिहासात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात एकूण 24 सामने खेळले गेले आहेत. या काळात, सनरायझर्स हैदराबादने वरचढ कामगिरी केली आहे. सनरायझर्स हैदराबाद संघाने 13 सामने जिंकले आहेत. तर, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने फक्त 11 सामने जिंकले आहेत. या हंगामात दोन्ही संघांमधील ही पहिलीच भेट आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात दोन्ही संघांमध्ये दोन सामने खेळले गेले होते. या काळात दोन्ही संघांनी प्रत्येकी एक सामना जिंकला होता. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला हा सामना जिंकून त्यांची आकडेवारी सुधारायची आहे.
हे देखील वाचा: Lucknow Beat Gujarat IPL 2025: लखनौ सुपर जायंट्सने गुजरात टायटन्सचा 33 धावांनी केला पराभव, विल्यम ओ'रोर्कची घातक गोलदांजी
किती वाजता सुरु होणार सामना?
सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आयपीएल 2025 चा 65 वा सामना शुक्रवार, 23 मे रोजी खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. या सामन्यात दोन्ही संघांचे कर्णधार टॉसच्या अर्धा तास आधी म्हणजेच संध्याकाळी 7 वाजता मैदानावर असतील.
कुठे पाहणार लाईव्ह सामना?
भारतीय चाहते स्टार स्पोर्ट्स नेटवर्क तसेच स्पोर्ट्स 18 नेटवर्कवर टीव्हीवर SRH विरुद्ध RCB आयपीएल 2025 चा 65 वा सामना थेट पाहू शकतील. येथे वेगवेगळ्या चॅनेलवर वेगवेगळ्या भाषांमध्ये समालोचन ऐकण्यासाठी उपलब्ध असेल. तसेच सामन्याचे लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही JioHotstar वर पाहू शकाल. येथे तुम्हाला हिंदी आणि इंग्रजीसह अनेक भारतीय भाषांमध्ये समालोचन ऐकायला मिळेल.