बेन स्टोक्स याच्यावर पत्नी क्लेअर चा गळा आवळण्याची अफवाह, पत्नीने ट्विटरवर स्पष्टीकरण देत केले 'हे' Tweet
बेन स्टोक्स आणि पत्नी क्लेअर (Photo Credit: Twitter)

इंग्लंड क्रिकेट संघाचा अष्टपैलू बेन स्टोक्स (Ben Stokes) हा अल्पावधी वेळात जगातील प्रस्थापित क्रिकेटपटूंपैकी एक झाला आहे. इंग्लंडला प्रथमच आयसीसी वनडे विश्वचषक स्पर्धेचे विजेते मिळवून देण्यात स्टोक्सने महत्वाचे योगदान दिले होते. इतकेच नाही तर, काही काळ आधी ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस (Ashes) मालिकेत संघाला बरोबरीत आणण्यासाठी स्टोक्सच्या शतकांचे खूप महत्व होते. पण, आता इंग्लंडचा हा दिग्गत अष्टपैलू चुकीच्या बातम्यांसाठी चर्चेत आला आहे. आरोप आहे की स्टोक्सने पत्नी क्लेअर ला जोरदार मारहाण केली. मात्र स्टोक्सची पत्नी क्लेअरने (Claire) हे आरोप सरसकट फेटाळले आहेत. द इंडिपेंडंटच्या अहवालानुसार, वेबसाइटने एक फोटो छापला होता जिथे स्टोक्सचाहात त्याच्या पत्नीच्या गळ्यावर होता. ही संपूर्ण बाब प्रोफेशनल क्रिकेटर्स असोसिएशन अवॉर्ड्स दरम्यानची आहे. (IND vs SA 1st Test 2019: क्विंटन डी कॉक याच्या शतकी खेळीबाबत जोफ्रा आर्चर याने 5 वर्षांपूर्वी केली होती भविष्यवाणी? पहा हे Tweet)

हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि आता स्टोक्सची पत्नी क्लेअरने स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी लिहिले, 'अविश्वसनीय, लोकांनी मूर्खपणाने काय केले आहे. मी आणि बेन एकमेकांचे चेहरे ओढत होतो आणि एकमेकांशी भांडत होतो कारण असेच आम्ही एकमेकांबद्दल असलेले आपले प्रेम व्यक्त करतो, पण लोकांनी कहाणी बनवून टाकली आणि या माध्यमातून आम्ही काहीतरी मजेदार करण्याचा प्रयत्न करीत होतो." यानंतर स्टोक्सने पत्नीच्या ट्विटवर किस्स करणारा एक इमोजीही शेअर केला आहे. पहा क्लेअरचे हे ट्विट:

दरम्यान, याच पुरस्कार सोहळ्यात 28 वर्षीय बेनला यंदाचा प्लेअर ऑफ दी इयर पुरस्कार देण्यात आला. यावर्षी 14 जुलै रोजी लॉर्ड्स येथे झालेल्या आयसीसी विश्वचषक फायनलमध्ये बेनने न्यूझीलंडविरुद्ध नाबाद 84 धावा केल्या. स्टोक्सच्या अर्धशतकी खेळीमुळे इंग्लंडला सामना सुपर-ओव्हर पेरण्यात नेण्यात यश आले. याशिवाय हेडिंगले येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध अ‍ॅशेस मालिकेच्या तिसऱ्या सामन्यात नाबाद 135 धावा करुन त्याने संघाला आश्चर्यकारक विजय मिळवून दिला होता.