विश्वचषक आणि ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध अॅशेस मालिकेत शानदार प्रदर्शन करणारा जोफ्रा आर्चर (Jofra Archer) क्रिकेट चाहत्यांमध्ये चांगलाच चर्चेचा विषय बनला आहे. या दोन्ही स्पर्धेदरम्यान, आर्चर जेवढ्या त्याच्या गोलंदाजीची चर्चेत राहिला तितक्यच त्याच्या ट्विटरवरील पोस्टसाठी त्याची वाहवाही होऊ लागली. काही महिन्यांपूर्वी विश्वचषकच्या सेमीफायनलमध्ये असे काहीतरी घडले की यामुळे आर्चरचे जुने ट्वीट चेचेत आली. आर्चरने काही वर्षांपूर्वी विश्वचषक सामन्यादरम्यान पाऊस पडण्यापासून सुपर-ओव्हर पर्यंत सर्वांबाबत काही भाकीत केले होते. आणि आता पुन्हा एकदा आर्चरचे पाच वर्ष जुने ट्वीट चर्चेत आले आहे. आणि ते इंग्लंड संघाशी निगडित नसून दक्षिण आफ्रिका संघाचा (South Africa) विकेटकीपर-फलंदाज क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) याच्याबाबत आहे. डी कॉक सध्या भारत (India) संघाविरुद्ध टेस्ट मालिका खेळत आहे. (IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिका 431 धावांवर All Out, भारताला 71 धावांची आघाडी)
आर्चरने पाच वर्षांपूर्वी डी कॉकच्या शतकाबाबत एक ट्विट केले होते. आर्चरने ट्विट केले की, 'एक टन डी कॉक'. आर्चरने 4-5 वर्षांपूर्वीच डी कॉकच्या शतकाबाबतची भविष्यवाणी केली होती. टीम इंडियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या टेस्ट मॅचमध्ये आफ्रिकी संघाने 5 विकेट गमावल्यावर डीन एल्गार एकाकी झुंज देत होता. पण, नंतर फलंदाजीसाठी आलेल्या डी कॉकने एल्गारला चांगली साथ दिली आणि दोंघांनी सहाव्या विकेटसाठी 150 धावांची महत्वपूर्ण भागीदारी केली. यादरम्यान, डी कॉकने टेस्टमधील चौथे शतक केले.
A ton de kock
— Jofra Archer (@JofraArcher) November 21, 2014
भारतीय संघाविरुद्ध पहिल्या टेस्ट च्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकी संघ 431 धावांवर ऑल आऊट झाला. आफ्रिकासाठी डीन एल्गार आणि क्विंटन डी कॉक यांनी सर्वाधिक धावा केल्या. एल्गार याने पहिले कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि नंतरडी कॉकच्या साथीने शतकी भागीदारी केली आणि संघाला संघर्षपूर्ण स्कोर करण्यास सहाय्य केले. आफ्रिकेच्या पहिल्या डावात भारतासाठी रविचंद्रन अश्विनने 7 गडी बाद केले, रवींद्र जडेजाने 2 आणि इशांत शर्मा याला 1 विकेट मिळाली.