IND vs SA 1st Test Day 4: दक्षिण आफ्रिका 431 धावांवर All Out, भारताला 71 धावांची आघाडी
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (Photo Credits: Getty Images)

भारतीय संघा (Indian Team) विरुद्ध पहिल्या टेस्ट च्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकी (South Africa) संघ 431धावांवर ऑल आऊट झाला. यासह टीम इंडियाला पहिल्या टेस्टमध्ये 71 धावांची आघाडी मिळाली आहे. अखेरच्या काही क्षणात सेनुरान मुथुसामी (Senuran Muthusamy) याने मोठे शॉट्स खेळले आणि दोन्ही संघाच्या धावांचे अंतर कमी केले. आफ्रिकासाठी डीन एल्गार (Dean Elgar) आणि क्विंटन डी कॉक (Quinton de Kock) यांनी सर्वाधिक धावा केल्या. एल्गार याने पहिले कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि नंतरडी कॉकच्या साथीने शतकी भागीदारी केली आणि संघाला संघर्षपूर्ण स्कोर करण्यास सहाय्य केले. दुसऱ्या दिवशी भारताने 502 धावांवर पहिला डाव घोषित केल्यावर शेवटच्या सत्रात रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. अश्विन आणि जडेजाने दुसऱ्या दिवशी अनुक्रमे 2 आणि 1 विकेट घेतल्या आणि आफ्रिकी संघाला बॅकफुटवर पाठवले. त्यानंतर तिसऱ्या दिवशी एल्गारने 160 धावांची महत्वपूर्ण खेळी करत संघाची स्थिती सुधरवली. (IND vs SA 1st Test 2019: 'क्रिकेट मॅच पाहणे का सोडले', या प्रश्नावर रविचंद्रन अश्विन याची मजेदार प्रतिक्रिया, पहा Video)

तिसऱ्या दिवशी भारतीय गोलंदाज सुरुवातीला प्रभाव पडू शकले नाही. एल्गर आणि कर्णधार फाफ ड्यु प्लेसिस यांच्या भागिदारीने आफ्रिका संघ चांगल्या स्थितीत पोहचला. फाफ आणि एल्गर यांनी पाचव्या विकेटसाठी 115 धावांची भागिदारी केली. यादरम्यान डु प्लेसिसने अर्धशतक पूर्ण केले, पण अश्विनने त्वरित डु प्लेसिसला 55 धावांवर बाद केले. त्यानंतर डी कॉक आणि एल्गर यांनी आक्रमक फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांचा चांगला सामना केला. एल्गर आणि डी कॉक यांनी 150 धांवांची भागिदारी केली. आफ्रिकी फलंदाजी भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत असताना जडेजाने एल्गारला बाद केले आणि संघाला बऱ्याच वेळाने एक यश मिळवून दिले. एल्गारची विकेट जडेजाच्या टेस्ट कारकिर्दीतील 200 वी विकेट होती. जडेजाने 44 सामन्यात 200 विकेट घेण्याची कामगिरी केली.

यापूर्वी, टीम इंडियाने मयंक अग्रवाल याचे दुहेरी शतक आणि रोहित शर्मा यांच्या दीडशे धावांच्या जोरावर 500 धावांचा टप्पा गाठला. आफ्रिकेच्या पहिल्या डावात अश्विनने 7 गडी बाद केले, जडेजाने 2 आणि इशांत शर्मा याला 1 विकेट मिळाली. अन्य कोणताही गोलंदाज यश मिळवू शकला नाही.