BCCI Apex Council Meet: बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलची 17 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन बैठक; इंग्लंडविरुद्ध मालिका, घरगुती हंगामावर होणार चर्चा
बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Photo Credits: IANS)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रसारामुळे मार्च महिन्यापासून भारतीय संघाचे (Indian Team) आंतरराष्ट्रीय दौरे स्थगित करण्यात आले आहेत. सध्या भारतीय आणि अन्य विदेशी क्रिकेटर्स युएईमध्ये आयपीएलचा आनंद घेत आहेत. PTIच्या वृत्तानुसार, बीसीसीआयने (BCCI) देखील भारतात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. बीसीसीआय अ‍ॅपेक्स कौन्सिलची (BCCI Apex Council) 17 ऑक्टोबर रोजी ऑनलाईन बैठक आहे ज्यात इंग्लंडविरुद्ध भारताची मालिका (Home Series vs England), आगामी ऑस्ट्रेलिया दौरा (India Tour of Australia) आणि स्थानिक सत्रातील वेळापत्रकांवर (Domestic Schedule) चर्चा केली जाईल. बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाले होते की इंग्लंडविरुद्ध भारत होणारी मालिका देशातच कायम राहील आणि कोविड-19 ची स्थिती अस्थिर असतानाही घरगुती स्पर्धा काही काळ सुरू होईल याची खात्री करण्यासाठी बीसीसीआय सर्वतोपरी प्रयत्न करेल. भारत कोरोना व्हायरसग्रस्तांची संख्या 70 लाखांच्या आसपास आहे आणि मृतांचा आकडा 1 लाखांच्या पुढे गेला आहे. पुढील वर्षी जानेवारी ते मार्च यादरम्यान इंग्लंड संघ पाच कसोटी, तीन वनडे आणि तीन टी-20 सामन्यांसाठी भारत दौर्‍यावर येणार आहे. (India Tour of Australia 2020: 17 डिसेंबरपासून खेळली जाईल भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान टेस्ट मालिका, असे असू शकते टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौर्‍याचे वेळापत्रक)

भारतातील वाढत्या कोविड प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर सध्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 13व्या सत्राचे आयोजन करणारे युएई इंग्लंडविरुद्ध घरच्या मालिकेसाठी पर्याय म्हणून समोर आले आहे. तथापि, इंग्लंडच्या संघाचे आयोजन करण्यास भारत सक्षम असेल तर वानखेडे स्टेडियम, क्रिकेट क्लब ऑफ इंडिया आणि डीवाय वाय पाटील स्टेडियम अशा तीन आंतरराष्ट्रीय स्थळांसह मुंबईमध्ये एक बबल निर्माण करणे शक्य होईल. अहमदाबाद येथील नवीन मोटेरा स्टेडियममधील अत्याधुनिक पायाभूत सुविधा देखील मंडळासाठी पर्याय असेल.

दुसरीकडे, घरगुती सर्किट संदर्भात, बीसीसीआयने सुरुवातीला 19 नोव्हेंबरपासून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी सुरुवात करण्याची योजना आखली होती, परंतु कोरोना महामारीमुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, घरगुती हंगामात काय सुरू होईल याची योजना आखण्यापूर्वी काही बाबी विचारात घ्याव्या लागतील.