BBL 2019-20: आरोन फिंच याच्या मेलबर्न रेनेगेड्स संघाने सलग 6 सामने गमावल्यावर Netizens म्हणाले RCB च्या अभिशापाने दिली धडक
आरोन फिंच (Photo Credit: Getty Images)

बिग बॅश लीग (Big Bash League) च्या चालू हंगामात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) नवीन भरती, आरोन फिंच (Aaron Finch) याचा खराब वेळ सुरु आहे. गेल्या हंगामात मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) संघाला जेतेपद मिळवून दिल्यापासून चालू हंगामात संघाला अशाच प्रकारची कामगिरी करण्यासाठी प्रेरित करण्यास फिंच अपयशी ठरला आहेत. सुरुवातीचे सलग सहा सामने गमावल्यानंतर रेनेगेड्स संघ सध्या गुणतालिकेत अंतिम स्थानी आहे. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात सिडनी थंडरने (Sydney Thunder) त्यांना सहा गडी राखून पराभूत केले. पर्थ स्कॉर्चर्स (Perth Scorchers) विरुद्ध पुढील सामन्यात रेनेगॅड्सने चांगली कामगिरी बजावली परंतु विजय मिळवण्यात यश आले नाही. 197 च्या मोठ्या धावांचा पाठलाग करताना फिंचच्या नेतृत्वाखालील संघाला 11 धावांनी कमी पडल्या आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. त्यांच्या तिसऱ्या सामन्यात होबार्ट हरिकेन्स (Hobart Hurricanes) ने त्यांना सात गडी राखून पराभूत केले. अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) ने मेलबर्नला 18 धावांनी पराभूत केले आणि रेनेगॅड्स अजूनही त्यांच्या पहिल्या विजयाच्या शोधात आहे. स्ट्रायकर्सविरुद्ध पराभवानंतर सिडनी सिक्सर्स (Sydney Sixers) विरुद्धही सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला. (Big Bash League 2019-20: पीटर सिडल याने एमएस धोनी स्टाईलमध्ये केले रनआऊट, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल Wow)

रेनेगॅड्सच्या हंगामाच्या धक्कादायक सुरुवातीच्या पार्श्वभूमीवर, अनेक चाहत्यांचे मत आहे की यामागे आरसीबी कनेक्शन आहे जेणेकरून वाईट नशीब त्यांच्या मागे लागले आहे. रेनेगेड्सचा कर्णधार फिंचला नुकताच आयपीएलच्या लिलावात आरसीबीने विकत घेतले आणि स्पर्धेतील पोशाख त्यांच्या खराब नशिबाचे कारण असल्याचे अनेकांचे मत आहे. अलिकडच्या काळात, आरसीबीने सातत्याने खेळ करण्यासाठी संघर्ष केला, शिवाय योगा-योगाने गेल्या आयपीएलमध्ये त्यांनी आपले पहिले सहा सामने गमावले होते. पाहा मेलबर्नच्या पराभवावर नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया:

आरसीबी फॅन्स

आरोन फिंच आणि केन रिचर्डसनला घेतल्यावर

आरसीबी बद्दल फिंच

मेलबर्न विजयाच्या शोधात

आरसीबी हा सापळा, खेळाडू नाही

दरम्यान, रेनेगेड्स संघा विपरीत, फिंचने सभ्य कामगिरी केली आणि आतापर्यंत दोन अर्धशतकं ठोकली आहेत. पण, इतर साथीदारांना चांगली कामगिरी करण्यास प्रेरणा देण्यास आणि संघाला खराब स्थितीतून बाहेर काढण्यात मदत करता आली नाही. रेनेगेडस आता त्यांच्या पुढच्या सामन्यात विजय मिळवू इच्छित असेल.