Big Bash League 2019-20: पीटर सिडल याने एमएस धोनी स्टाईलमध्ये केले रनआऊट, व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल Wow
पीटर सिडल (Photo Credit: Twitter/BBL)

31 डिसेंबर रोजी बिग बॅश लीग (Big Bash League) मधील सिडनी थंडर आणि अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स यांच्यात झालेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पीटर सिडल (Peter Siddle) याने महेंद्र सिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याच्या स्टाईलमध्ये रनआऊट केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. cricket.com.au ने याचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. सिडलने नुकतंच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून सध्या तो बिग बॅश लीगमध्ये अ‍ॅडलेड स्ट्राईकर्स (Adelaide Strikers) कडून खेळत आहे. गोलंदाजीच्या वेळी सिडलने असा एक रनआऊट केला की तो पाहून तुम्हाला लगेचच धोनीची आठवण येईल, कारण धोनीला वेगळ्या पद्धतीने धावबाद करण्यात तज्ञ मानले जाते. सिडनी थंडरने प्रथम फलंदाजी केली आणि उस्मान ख्वाजा आणि अ‍ॅलेक्स हेल्स डावाची सुरुवात करत 31 धावांची भागीदारी केली. हेल्स चार धावा काढून बाद झाला. त्यानंतर उस्मान ख्वाजा याने कॅलम फर्ग्युसन याच्या साथीने स्कोर 104 धावांपर्यंत पोहचवला. ख्वाजाने 50 चेंडूंत 63 धावांचे योगदान दिले आणि धावबादनंतर पॅव्हेलियनमध्ये परतला. (BBL 2019-20: रशीद खान याची अंपायरने केली टिंगल, आऊट देण्यासाठी उचलेल्या बोटाने खाजवू लागले नाक, पाहा Video)

14 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर तो धाव घेत असताना वेस अगर याने चेंडू पकडला आणि नॉन-स्ट्रायकरच्या दिशेने फेकला. सिडल स्टंपजवळ उभा होता आणि स्टम्स पाहिल्याशिवाय त्याने बॉलने बेल्स उडवल्या. धोनी सहसा अश्याप्रकारे धावबाद करण्यासाठी ओळखला जातो. न्यूझीलंडविरुद्ध रांचीमध्ये धोनीने रॉस टेलर याला एकदा अशाच काही प्रकारे बाद केले होते. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही नक्कीच धोनीच्या त्या जुन्या रनआऊटची आठवण येईल. पाहा:

दरम्यान, पहिले फलंदाजी करत सिडनी थंडरने 20 ओव्हरमध्ये पाच बाद 168 धावा केल्या. कर्णधार कॅलम फर्ग्युसन याने 73 धावा फटकावल्या. या सामन्यात सिडलने चार षटकांत 30 धावा देऊन दोन गडी बाद केले. सिडनी थंडरने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करत असलेला स्ट्रायकर्स संघ निर्णधारित ओव्हरमध्ये 9 गडी गमावून 165 धावाच करू शकला आणि फक्त तीन धावांनी त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.