Close
Search

BBL 2019-20: रशीद खान याची अंपायरने केली टिंगल, आऊट देण्यासाठी उचलेल्या बोटाने खाजवू लागले नाक, पाहा Video

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये राशिद खानची सर्वत्र चर्चा होत आहे. ग्राऊंड अंपायरने राशिदच्या एलबीडब्ल्यू अपीलचा निर्णय घेताना अचानक तो बदलला आणि आऊट देण्यासाठी वर केलेल्या बोटाने नाक खाजवू लागले.

क्रिकेट Priyanka Vartak|

ग्रेग डेव्हिडसन, रशीद खान (Photo Credit: Twitter/BBL)

ऑस्ट्रेलियामध्ये सध्या सुरु असलेल्या बिग बॅश लीगमध्ये (Big Bash League) राशिद खान (Rashid Khan) याची सर्वत्र चर्चा होत आहे. रविवारी अफगाणिस्तानच्या या खेळाडूने आपल्या टीम अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सचे (Adelaide Strikers) नेतृत्व करत मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) विरूद्ध संघाला विजय मिळवून दिला. रशीदने बॅट आणि बॉलने शानदार प्रदर्शन करत संघाचा विजय निश्चित केला. रविवारी खेळण्यात आलेल्या या मॅचमध्ये मजेदार अशी घटना पाहायला मिळाली. ग्राऊंड अंपायरने एलबीडब्ल्यूच्या अपीलचा निर्णय घेताना अचानक तो बदलला आणि आऊट देण्यासाठी वर केलेल्या बोटाने नाक खाजवू लागले. अंपायर ग्रेग डेव्हिडसन वर्षानुवर्षे लक्षात लक्षात राहण्यासारख्या या क्षणाचा भाग बनले. ही घटना मेलबर्न रेनेगेडसच्या डावातील 17 वे ओव्हर आहे जेव्हा रशीदने ओव्हरच्या तिसर्‍या बॉलवर वेबस्टरविरूद्ध एलबीडब्ल्यूसाठी अपील केले. अपीलानंतर अंपायर डेव्हिडसनने आऊट देण्यासाठी बोट जवळ-जवळ उचलले होते, पण शेवटी त्यांनी आपला निर्णय बदलला आणि आऊट देण्यासाठी उचलेल्या बोटाने नाक खुजावले. (Video: झए रिचर्डसन याचा अचूक थ्रो, बिग बॅश लीग सामन्यातील 'हा' रन-आऊट पाहून प्रेक्षक झाले आश्चर्यचकित)

अंपायरने बोट वर करताच राशिद आणि अ‍ॅडलेड स्ट्रायकर्सच्या खेळाडूंनी उत्सव साजरा करण्यास सुरवात केली, परंतु त्यानंतर त्याने पाहिले की पंचांनी फलंदाजाला आऊट दिले नाही. अंपायरने खेळाडूंना सांगितले की मी फलंदाजाला बाहेर दिले नाही परंतु नाक खुजावले आहे. डेव्हिडसनच्या या निर्णयानंतर सर्व खेळाडू आश्चर्यचकित झाले. पाहा हा मजेदार व्हिडिओ:

दुसरीकडे, याच मॅचमध्ये राशिदने सर्वांना चकित करत वेगळ्याच बॅटने फलंदाजी केली, ज्याला यूजर्स 'कॅमल बॅट' म्हणत आहेत. त्या बॅटचा आकार उंटाच्या पाठीसारखा होता. या बॅटला एक किंवा दोन स्वीट स्पॉट होते आणि याचा फायदा रशीदला झाला. राशिदने दोन उत्कृष्ट षटकार आणि दोन चौकार ठोकले आणि अवघ्या 16 चेंडूत 25 धावांचे योगदान दिले. अंपायर ग्रेगच्या निर्णयाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या सामन्यात अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्सने मेलबर्न रेनेगेडसचा 18 धावांनी पराभव केला. अ‍ॅडिलेडने पहिले फलंदाजी करत 20 षटकांत 155 धावा केल्या, प्रत्युत्तरात मेलबर्न संघ 20 षटकांत केवळ 137 धावाच करू शकला.

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change
Close
Latestly whatsapp channel