(Photo Credit: Twitter/@BBL)

बिग बॅश लीगच्या (Big Bash League) अ‍ॅडिलेड ओव्हलच्या मैदानावर पर्थ स्कॉचर्स (Perth  Scorchers) आणि अ‍ॅडिलेड स्ट्रायकर्स (Adelaide Strikers) संघात झालेल्या मॅचदरम्यान एक विचित्र घटना पाहायला मिळाली. या मॅचमध्ये असे काही घडले जे पाहून खेळाडूच नाही तर चाहतेही थक्क राहिले. ऑस्ट्रेलियाच्या उन्हाळ्यात टी-20 बिग बॅश लीगने चाहत्यांवर वर्चस्व गाजवले आहे.  सामन्यात पर्थ कर्णधार मिशेल मार्श या ने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजीचा निर्णय घेतला. सामन्यात अ‍ॅडलेडचे फलंदाज चांगली फलंदाजी करीत होते. तेव्हा डावाच्या 16 व्या षटकात झए रिचर्डसन (Jhye Richardson) याने आपल्या क्षेत्ररक्षणाची चमक दाखवत असे काही केले जे आजच्या पूर्वी क्रिकेटच्या क्षेत्रात दिसले नव्हते. 47 चेंडूंमध्ये 10 चौकार आणि 3 षटकार ठोकणार्‍या जेक विथराल्डने (Jake Weatherald) थर्ड मॅनच्या दिशेने शॉट खेळत धाव घेतली. बाउंड्री लाईनवर रिचर्डसन फिल्डिंग करत होता. त्याने पटकन आपली चपळता दाखवत चेंडू पकडला आणि उत्तम प्रकारे बोल्ड अ‍ॅक्शनने चेंडू फेकला. हा थ्रो एकदम अचूक आणि स्टंपच्या दिशेने टाकला. विकेटकीपरने चेंडू पकडण्यात उशीत केला नाही आणि लगेच स्टंप्सच्या बेल्स उडवत फलंदाजाला रन-आऊट केले.

रिचर्डसनच्या या थ्रोची शैली सर्वांनाच पसंत पडली, त्यानंतर सोशल मीडियावर याचा व्हिडिओही मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.  या रन-आऊट नंतरही संघाला जास्त नुकसान झाले नाही आणि अ‍ॅलेक्स कॅरीने वेदरलँडच्या साथीने तुफान बॅटिंग केली आणि संघाला मजबूत स्थितीत नेले. पाहा या रन-आऊटचा हा व्हिडिओ:

पहिले फलंदाजी करत अ‍ॅडलेडने पर्थसमोर 199 धावांचे विशाल लक्ष्य ठेवले. याच्या प्रत्युत्तरात पर्थचा सलामी फलंदाज जिश इंग्लिसने 27 चेंडूत 50 धावा आणि लीम लिव्हिंगस्टोनने 26 चेंडूत 69 धावा केल्या. पण अन्य पर्थ फलंदाजांना या चांगल्या सुरूवातीचा फायदा घेता आला नाही आणि अख्खी टीम 183 धावांवर ऑल आऊट झाला. पर्थने हा सामना 15 धावांनी गमावला.