Bangladesh National Under-19 Cricket Team vs Sri Lanka National Under-19 Cricket Team ACC U19 Asia Cup 2024 Live Streaming: एसीसी अंडर-19 आशिया कप 2024 चा 9 वा सामना आज बांगलादेश विरुद्ध श्रीलंका (Bangladesh vs Sri Lanka) यांच्यात खेळवला जाणार आहे. उभय संघांमधील हा सामना दुबईतील आयसीसी अकादमी मैदानावर होणार आहे. या स्पर्धेत दोन्ही संघांनी आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. बांगलादेशने आपले सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले असून ते 4 गुणांसह दुसऱ्या स्थानावर संघ आहे. दुसरीकडे श्रीलंकेच्या संघानेही आपले दोन्ही सामने जिंकले आहेत. श्रीलंकेचा संघ 4 गुणांसह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर आहे. दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळणार आहे. (Afghanistan vs Nepal ACC Under 19 Asia Cup 2024 Live Streaming: अफगाणिस्तान-नेपाळ यांच्यातील सामना कधी, कुठे आणि कसा खेळवला जाईल? घ्या जाणून)
अंडर-19 आशिया कप 2024 चा 9 वा सामना कधी होणार आहे?
एसीसी अंडर-19 आशिया चषक 2024 मध्ये बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील 9वा सामना मंगळवारी 3 डिसेंबर रोजी दुबईतील आयसीसी अकॅडमी मैदानावर सकाळी 10:30 वाजता सुरू झाला आहे.
अंडर-19 आशिया कप 2024 चा 9 वा सामना कसा पहाल?
बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील अंडर 19 आशिया कप 2024चा 9वा सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कच्या सोनी स्पोर्ट्स टेन 5 एसडी आणि एचडी आणि सोनी स्पोर्ट्स टेन 3 एसडी आणि एचडी चॅनेलवर थेट प्रसारित केला जाईल. सोनी लाईव्ह ॲप आणि वेबसाइटवर लाइव्ह स्ट्रीमिंग उपलब्ध असेल.
दोन्ही संघांचे खेळाडू
श्रीलंका अंडर 19 संघ: दुलानिथ सिगेरा, पुलिंदू परेरा, शरुजन षणमुगनाथन (विकेटकीपर), विमथ दिनसारा, लकविन अबेसिंघे, कविजा गमागे, वीरन चामुदिथा, विहास थेवमिका (कर्णधार), न्यूटन रंजीत कुमार, प्रवीण मनीषा, मथुलान पेरेरा, मथुलान पेरेरा, मथुलान कुवेरा, रंजित कुमार , गीतिका डी सिल्वा, तनुजा राजपक्षे
बांगलादेश अंडर 19 संघ: जवाद अबरार, कलाम सिद्दीकी ऍलन, मोहम्मद अझीझुल हकीम तामीन (कर्णधार), मोहम्मद शिहाब जेम्स, मोहम्मद फरीद हसन फैसल (विकेटकीपर), मोहम्मद रिझान होसन, देबाशीष सरकार देबा, अल फहाद, मोहम्मद रफी उज्जमान रफी, मोहम्मद इक्बाल हुसेन अम्मोन, साद इस्लाम रझिन, एमडी समियून बसीर रातुल, एमडी रिफत बेग, अश्रफुझमान बोरेनो, मारूफ मृधा