
कोरोना व्हायरसमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटची हानी सुरूच आहे. ऑस्ट्रेलिया (Australia) आणि वेस्ट इंडीज (West Indies) यांच्यात ऑक्टोबरमध्ये होणारी टी-20 मालिका पुढे ढकलण्यात आली आहे. दोन्ही देशांच्या क्रिकेट मंडळाने संमतीने हा निर्णय घेतला. मालिका रद्द झाल्यामुळे आता ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडीजचे क्रिकेटर्स इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) संपूर्ण मोसमात उपलब्ध असतील. ऑक्टोबरमध्ये दोन्ही देशांमध्ये तीन टी-20 सामन्यांची मालिका होणार होती. या मालिकेचे सामने 4 ऑक्टोबर, 6 ऑक्टोबर आणि 9 ऑक्टोबर रोजी होणार होते. 18 ऑक्टोबरपासून सुरू होणार्या वर्ल्ड कपच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर ही मालिका महत्त्वपूर्ण होती, पण आयसीसीने यावर्षी ऑस्ट्रेलियामध्ये होणारा टी-20 विश्वचषक रद्द केला आहे. यापूर्वी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ऑक्टोबरमध्ये खेळली जाणारी टी -20 मालिका रद्द केली गेली आहे. भारत-ऑस्ट्रेलियामधील टी-20 मालिका पुन्हा होणार की नाही याचा निर्णय झालेला नाही. पण, क्रिकेट ऑस्ट्रेलियाने नुकतच डिसेंबर-जानेवारीच्या दौर्यावर भारताला टी-20 मालिका खेळण्याचे आवाहन केले आहे. (IPL 2020 Update: क्रिस गेल आयपीएलच्या सुरुवातीला किंग्ज इलेव्हन पंजाब संघात होणार सामील? पाहा कसे)
“ऑस्ट्रेलियामध्ये पुन्हा खेळल्या जाणार्या टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आयोजित होणाऱ्या वेस्ट इंडीजविरुद्ध 3 टी-20 सामन्यांच्या मालिकेचे आयोजनास प्राधान्य दिले गेलेल्या सामन्यांना पुढे ढकलण्यास (2021 मध्ये किंवा 2022 मध्ये) सहमती दर्शविली आहे,” सीएने एका निवेदनात म्हटले. ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्सनी 13 मार्चपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेले नाहीत. अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया पुढच्या महिन्यात इंग्लंडविरुद्ध मर्यादित ओव्हरची मालिका खेळेल असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेच्या तारखांचा निर्णय अद्याप बाकी आहे.
The three-T20I West Indies tour of Australia, initially scheduled to take place in October in lead up to the @T20WorldCup, has been postponed. pic.twitter.com/LXHkQOcY8C
— ICC (@ICC) August 4, 2020
ऑस्ट्रेलियन संघ नोव्हेंबरच्या शेवटी त्यांच्या घरच्या मैदानावर खेळताना दिसू शकतो. 21 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान यांच्यात एक कसोटी सामना खेळला जाणार आहे. यानंतर भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान चार कसोटी सामन्यांची मालिका 3 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ऑस्ट्रेलियाने नुकताच या महिन्यात न्यूझीलंड आणि झिम्बाब्वेविरुद्ध होणारी मालिका रद्द केली.