Photo Credit- X

Australia vs India 5th Test 2024: भारताविरुद्ध (AUS vs IND)शुक्रवारपासून सुरू होणाऱ्या पाचव्या आणि अंतिम कसोटीसाठी फॉर्मात नसलेल्या मिचेल मार्शच्या जागी अष्टपैलू खेळाडू ब्यू वेबस्टरला ऑस्ट्रेलियन संघात स्थान देण्यात आले आहे. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने (Pat Cummins)गुरुवारी ही माहिती दिली. तेहतीस वर्षीय मार्शला चार कसोटींच्या सात डावांत केवळ 73 धावा करता आल्या आहेत. आतापर्यंत त्याने केवळ 33 षटके टाकली आहेत आणि तीन विकेट्स घेतले आहेत.

पॅट कमिन्सने सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत म्हटले की, “संघात बदल करण्यात आला आहे. मिचेल मार्शच्या जागी ब्यू वेबस्टर खेळणार आहे.'' नोव्हेंबरमध्ये भारत अ विरुद्ध खेळलेल्या 31 वर्षीय वेबस्टरने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 148 विकेट घेतल्या आहेत. त्याशिवाय, 5247 धावा केल्या आहेत. (Zimbabwe vs Afghanistan 2nd Test 2025 Day 1 Live Streaming: झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यातील दुसरा कसोटी सामना कधी, कुठे आणि कसा पहाल? घ्या जाणून)

कमिन्सने मिचेल स्टार्कच्या तंदुरुस्तीबाबतच्या चर्चांना पूर्णविराम देत तो पाचवी कसोटी खेळणार असल्याचे सांगितले. स्टार्क म्हणाला, "स्कॅनिंग करण्यात आले आहे. तो खेळण्यासाठी तंदुरुस्त आहे." बॉक्सिंग डे टेस्टमध्ये स्टार्कला बरगड्याच्या सूजने त्रास होत होता. पण त्याने प्रभावी गोलंदाजी केली.