Asia Cup 2021 झाल्यास आपल्या 'बी' संघाला मैदानात उतरवणार Team India, IPL मध्ये ताबडतोड कामगिरी करणाऱ्या ‘या’ खेळाडूंना मिळू शकते संधी

India’s Strongest Team B Predicted XI For Asia Cup: आगामी एशिया कपमध्ये (Asia Cup) टीम इंडियाच्या (Team India) सहभागाबद्दल शंका आहे. कोविड-19 च्या कारणास्तव मागील वर्षी यंदा जून महिन्यासाठी स्थगित करण्यात आली होती. यावर्षी जून 2021 अखेर श्रीलंकेत आशिया चषक होणार आहे मात्र तेव्हाच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा फायनल (WTC Final) सामना देखील रंगणार असल्यामुळे टीम इंडियामध्ये काही बदल होऊ शकतात. न्यूझीलंड संघाविरुद्ध 18 जून ते 23 जून दरम्यान भारत आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळणार आहे. अशा परिस्थितीत यंदा आशिया चषक रद्द/स्थगित झाला नाही तर बीसीसीआय (BCCI) आणखी एक संघ पाठवेल. विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत, जसप्रीत बुमराह यांच्यासह बरेच महत्त्वाचे खेळाडू आशिया चषक स्पर्धेत भाग घेऊ शकणार नाहीत. त्यामुळे, आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली ओळख पटवण्याची युवा खेळाडूंना मोठी संधी असेल. (Cricket World Cup: 2023 वर्ल्ड कपनंतर ‘हे’ 5 युवा असू शकतात Team India कर्णधारपदाचे दावेदार, सुरु होणार विराट कोहलीच्या उत्तराधिकारीची रेस)

आशिया चषक स्पर्धेसाठी भारताची सर्वात मोठी दुसरी तारांकित संभाव्य प्लेइंग इलेव्हन

1. केएल राहुल (कॅप्टन)

विराट कोहली आणि रोहित शर्माच्या अनुपस्थितीत राहुल बहुधा संघाचा कर्णधार असेल आणि तो फलंदाजीबरोबर विकेटच्या मागे देखील महत्वाची भूमिका बजावेल. गेल्या दोन वर्षात त्याने बराच अनुभव मिळवला आहे जो या स्पर्धेत संघाच्या कामी येऊ शकतो. राहुलने मागील वर्षी आयपीएलमध्ये देखील चांगली कामगिरी बजावली होती आणि यंदाच्या त्याच्या बॅटमधून धावा निघत आहेत त्यामुळे, बोर्ड त्याच्या अधिक जबाबदारी देऊ शकते.

2. शिखर धवन (Shikhar Dhawan)

राहुलच्या साथीला धवनचा बॅटने अनुभव नक्कीच उपयोगी पडू शकतो. 2018 आशिया चषकमध्ये तो सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही होता. रोहितच्या अनुपस्थितीत धवनवर ज्येष्ठ सलामी फलंदाजाची जबादारी असेल.

3. ईशान किशन (Ishan Kishan)

इंग्लंडविरुद्ध दमदार टी-20 पदार्पण करणारा ईशान किशन तिसऱ्या स्थानावर फलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. आयपीएल फ्रँचायझी मुंबई इंडियन्सप्रमाणेच टीम इंडियामध्ये देखील किशनवर मधल्या फळीत धावगती वाढवण्याची जबाबदारी असेल. शिवाय तो संघाला एक अतिरिक्त विकेटकीपरचा पर्याय देखील उपलब्ध करून देऊ शकतो.

4. सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav)

आशिया कप यंदा टी-20 फॉरमॅटमध्ये होणार असल्याने सूर्यकुमारचे नाव यात नसणे शक्यच नाही. मागील वर्षी मुंबईला आयपीएलविजेतेपद मिळवून देण्यात आणि यंदा इंग्लंडविरुद्ध टी-20 पदार्पण करणाऱ्या यादवचा श्रीलंकेत होणाऱ्या स्पर्धेसाठी भारतीय संघात निवडले जाऊ शकते.

5. मनीष पांडे (Manish Pandey)

मनीष पांडे संघाच्या मधल्या फळीत एक आक्रमक फलंदाजाची भूमिका बजावू शकतो. आघाडीची फळी आपयशी ठरल्यास पांडे आपल्या बॅटिंगने मजबुती देऊ शकतो जेणेकरून संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाठण्यात मदत होईल.

6. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)

हार्दिक पांड्या संघाचा मुख्य अष्टपैलू असेल. सध्या पूर्वीप्रमाणे गोलंदाजी करू न शकणार हार्दिक बॅटिंग आणि आपल्या शानदार क्षेत्ररक्षणाने संघाचे बळ वाढवेल. हार्दिकची चपळ फिल्डिंग यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाली आहे.

7. वॉशिंग्टन सुंदर (Washington Sundar)

वॉशिंग्टन सुंदर संघाचा दुसरा अष्टपैलू असेल. हार्दिकनंतर सुंदर बॅट सोबत आपल्या फिरकी गोलंदाजीने विरोधी संघाला त्रास देण्यास सक्षम आहे.

8. शार्दुल ठाकूर (Shardul Thakur)

मुंबईकर शार्दूल बॉलसोबतच बॅटने देखील योगदान देऊ शकतो. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील कसोटी मालिका याचे सर्वोत्तम उदाहरण आहे. त्यामुळे खालच्या फळीत तो एक उपयुक्त फलंदाज सिद्ध होऊ शकतो.

9. प्रसिद्ध कृष्णा (Prasidh Krishna)

इंग्लंड विरोधात वनडे पदार्पण करणारा कृष्णा देखील आशिया कपसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्याचा दावेदार ठरू शकतो. मात्र त्याला आयपीएलमध्ये आपली कामगिरीत सुधार करण्याची गरज आहे.

10.भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)

भुवनेश्वर कुमार संघाच्या ज्येष्ठ वेगवान गोलंदाजांची भूमिका बजावताना दिसु शकतो. भुवी यापूर्वी इंग्लंड विरोधात टी-20  आणि वनडे मालिकेत झळकला. टी-20 मालिकेत त्याच्या पदरी 3 विकेट आल्या तर वनडे मालिकेत त्याने एकूण 6 विकेट्स घेतल्या. त्यामुळे, आता आंतरराष्ट्रीय पातळीवर आयसीसी स्पर्धेत आपली छाप सोडण्याच्या उद्देशाने तो मैदानात उतरू शकतो.

11. दीपक चाहर (Deepak Chahar)

भुवीसोबत दीपक चाहर सुरुवातीला आणि डेथ ओव्हर्समध्ये संघासाठी उपयुक्त गोलंदाज ठरू शकतो. दीपक आपल्या घातक वेगवान गोलंदाजीने फलंदाजांवर दबाव आणू शकतो तर डेथ ओव्हर्समध्ये यापूर्वी योग्य सिद्ध झाला आहे. शिवाय, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणाऱ्या एकमेव गोलंदाजाला संघाबाहेर ठेवणंही योग्य नाही.