Ashes 2021-22: जो रूटच्या जागी कसोटी कर्णधार म्हणून इंग्लंडचे नेतृत्व करण्यावर बेन स्टोक्सचे मोठे विधान, पहा काय म्हणाला स्टार अष्टपैलू
बेन स्टोक्स (Photo Credit: PTI)

ऑस्ट्रेलियात (Australia) सुरू असलेल्या अ‍ॅशेस कसोटी मालिकेतील (Ashes Test Series) निराशाजनक कामगिरीच्या पार्श्वभूमीवर स्टार अष्टपैलू बेन स्टोक्सने (Ben Stokes) जो रूटला  (Joe Root) इंग्लंडचा कर्णधारपदी कायम राहण्यासाठी पूर्ण पाठिंबा दिला आहे. स्टोक्स म्हणाला की, इंग्लंडच्या (England) आतापर्यंतच्या खराब प्रदर्शनाचा दोष कर्णधार रूट आणि मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड यांचा समावेश असलेल्या नेतृत्व गटाने नव्हे तर संपूर्ण संघाने वाटून घ्यावा. अ‍ॅशेसमध्ये (Ashes) इंग्लंडच्या निराशाजनक प्रदर्शनानंतर रूटच्या इंग्लंडचे नेतृत्व करण्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पहिल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये पाहुण्या संघाची दमछाक झाली आहे आणि ऑस्ट्रेलियाने 3-0 अशी आघाडी घेत मालिका जिंकली. पॅट कमिन्सच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलिया संघाला डाउन अंडर दौऱ्यावर आव्हान देऊनही इंग्लंडला (England) स्पर्धात्मक खेळ करता आला नाही. (Ashes 2021-22: जो रूटला काढून ‘या’ तडाखेबाज अष्टपैलूच्या हाती द्या इंग्लंड कसोटी संघाची कमान, माजी ऑस्ट्रेलियन दिग्गजचा सल्ला)

रुटच्या निवड कॉल्स आणि मैदानावरील डावपेचांची छाननी करण्यात आली आहे. जेफ्री बॉयकॉट आणि इयान चॅपेल सारख्यांनी इंग्लंडच्या अ‍ॅशेस मोहिमेदरम्यान रूटने नेतृत्व क्षमता गमावली असल्याचे सांगितले परंतु काहींनी असे निदर्शनास आणले आहे की इंग्लंडच्या समस्यांचे मूळ त्यांच्या कर्णधारापेक्षा खोलवर गेले आहे. जागतिक क्रमवारीत नंबर 1 कसोटी फलंदाजाने इंग्लंडच्या कसोटी कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतल्यास रूटच्या जागी स्टोक्सकडे आदर्श उमेदवार म्हणून पाहिले जात आहे. तथापि, स्टोक्सने म्हटले आहे की त्याला कधीही वरिष्ठ राष्ट्रीय संघाचा कर्णधार होण्याची इच्छा नव्हती. “कर्णधारपद हे क्षेत्र निश्चित करणे, संघ निवडणे, मैदानात निर्णय घेणे यापेक्षा अधिक आहे. कर्णधार असा असतो ज्यासाठी तुम्ही खेळता. जो रूट असा आहे ज्यासाठी मला नेहमी खेळायचे आहे. ख्रिस सिल्वरवूड अगदी तसेच आहेत. ते खरे खेळाडूंचे प्रशिक्षक आहेत. ते व्यक्ती आणि खेळाडू म्हणूनही तुमच्यासाठी उभे आहेत,” बेन स्टोक्सने द गार्डियनच्या हवाल्याने सांगितले.

सिडनी येथे 5 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या नवीन वर्षाच्या कसोटीत यजमानांशी होणाऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघातील बदल रोखण्याच्या इंग्लंड विचारात असेल. तथापि ते त्यांचे मुख्य प्रशिक्षक ख्रिस सिल्व्हरवुड आणि सपोर्ट स्टाफच्या आणखी तीन सदस्यांशिवाय खेळतील जे कोविड -19 पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयसोलेशनमध्ये आहेत. दुसरीकडे, वर्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील गुणांमध्ये वाढ करण्यासाठी ऑस्ट्रेलिया उर्वरित 2 कसोटी जिंकण्यासाठी उत्सुक असेल.